नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार, दलेलपुर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय गुरव

नंदुरबार :- सध्या काही दिवसांपासुन सातपुडा पर्वतरांगेतून हिंसक प्राणी विविध प्राण्यांना आहारा बनवत फस्त करत आहेत. आता मात्र त्यांनी आपला मोर्चा मानवांकडे वळविला आहे.

तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात शेतात बिबट्याने एक लहान बालकांवर हल्ला केला त्यात त्याचे दुःखद निधन झाल्याची घटना काल दुपारी घडली.

गेल्या अनेक दिवसांपासुन बिबट्या विषयी परिसरात बातमी पसरत आहे. सातपुडा परिसाराचा अनेक भागामध्ये बिबिट्या मुक्तपणे फिरत आहे. बिबट्याचा मुक्त संचारामुळे मानवावर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकरी व शेतमजुरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दलेलपूर शिवारात गुलाब सत्तार धानका व दामू सत्तार धानका यांच्या शेतात बिबट्याने गुरुदेव भरत वसावे वय 11 वर्ष या बालकावर हल्ला केला व त्यात बालकाचा मृत्यू झाला आहे. वनविभागाचे वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, जाण्या पाडवी, आशुतोष पावरा, राहुल कोकणी, डोंगरे आदींनी घटनास्थळी भेट दिली तसेच पंचनामा झालेला असुन. तळोदा पोलिसात नोंद झाली आहे. दलेलपूर अमोनी परिसरात बिबट्यामुळे झालेल्या हल्यात दुसरा बळी गेला आहे.
बिबट्याचा बंदोबस्त व उपाययोजना करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून वनविभागावाकडे केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:30 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!