नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अक्कलकुवा; आयुर्वेदिक सिरपच्या नावाखाली गुंगीकारक औषध निर्मिती कारखान्यावर गुजरात पोलिसांचा छापा

अक्कलकुवा पोलिसांची अर्थपूर्ण डोळे झाक की काय जन माणसात चर्चा?

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी: प्रभू तडवी.  

      अक्कलकुवा: अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावाहून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील उदेपूर शिवारामध्ये सुरू असलेल्या आयुर्वेदिक सिरपच्या नावाखाली गुंगीकारक औषध निर्मिती कारखान्यावर गुजरात पोलिसांनी छापा टाकून या कारखान्यातील गुंगीकारक औषध बनवण्यासाठी चे साहित्य तसेच इतर मुद्देमाल ताब्यात घेतले आहे. यातील दोन आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आला असून ते फरार असून कारखाना सुरू असलेल्या जमिनीच्या मालक खापर येथील परवानाधारक मद्यविक्री करणारा व्यावसायिक असल्याचे समोर आले आहे.
                याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील राजकोट येथील गुन्हा अन्वेषण शाखेने दिनांक 3 जुलै 2023 रोजी गोंडल रोड येथे तपासणीसाठी पाच ट्रक अडकविले होते या पाचही ट्रकांमधून रुपये 73 लाखांपेक्षा अधिक किमतीचे सिरप मिळून आले होते या सिरपची तपासणी करण्यासाठी सिरपच्या नमुना लॅबोरेटरी मध्ये पाठविण्यात आला होता. त्याबाबत आलेल्या अहवालात या गुंगीकारक औषधांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोलचे प्रमाण आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने राजकोट येथील एका बड्या राजकीय पक्षातील नेता असलेला रुपेश डोडिया व धर्मेश डोडिया या बंधुवर गुन्हा नोंदविण्यात आल्याने त्यांनी पोबारा केला होता. आयुर्वेदिक सिरपच्या नावाखाली गुंगीकारक नशायुक्त सिरपचा काळा कारोबार सुरू असल्याची बाब समोर आल्याने त्याची सखोल चौकशी करण्यासाठी राजकोट गुन्हे अन्वेषण शाखेचे  बी टी गोहिल यांच्या पथकाने धागेद्वारे तपासले असता महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील कारखान्यात हा गोरखधंदा सुरू असल्याने राजकोट गुन्हे शाखेने या कारखान्यावर छापा टाकून या कारखान्यातील मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उदेपूर शिवारात सदर कारखाना सुमारे एकरभर क्षेत्रामध्ये तयार करण्यात आला असून बडोदा येथील नितीन कोटवाणी याने हा कारखाना या ठिकाणी सुरू केला होता गुजरात राज्यातील बडोदा येथील सुरू असलेल्या त्याच्या कारखान्याचा परवाना 2021 साली रद्द झाल्यामुळे त्याने गुजरात व महाराष्ट्राच्या सीमावरती भागात असलेल्या या ठिकाणी आपला गोरख धंदा सुरू केला होता.

याच्याकडून आरोपी दोडिया बंधू सदर सिरप विकत घेत होते. गुजरात राज्यातील राजकोट गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याबाबत कारवाई करून कारखान्यातून हे गुंगीकारक औषध बनविण्यासाठीचे मशिनरी जमा केली असून कारखाना सुरू असलेल्या जमिनीचा मालक खापर येथील बडा परवानाधारक मद्यव्यवसायिक आहे.

शेवाळी नेत्रंग राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या या ठिकाणी सदर कारखाना पत्र्याच्या शेडमध्ये गेल्या एक ते दीड वर्षापासून सुरू असून या ठिकाणी दिवस रात्र मोठ्या ट्रक्स तसेच कंटेनर्स मोठ्या संख्येने येत होते मात्र या ठिकाणी काय सुरू आहे याबाबत सर्वच यंत्रणा अनभिज्ञ कशी राहू शकते असा प्रश्न निर्माण केला जात असून गुजरात पोलिसांनी केलेल्या या कारवाईने  महाराष्ट्र अर्थात नंदुरबार पोलिस व गुन्हे अन्वेषण शाखेला साधा सुगावाही लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या कारखान्यामध्ये गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर ट्रक्स तसेच कंटेनर ये जा करत होते या मार्गावर महाराष्ट्र स्थानिक पोलिसांचे तपासणी नाके असताना या कारखान्यात हा गुंगीकारक औषधी तयार करण्याचा गोरख धंदा सर्रासपणे सुरू होता. या कारखान्याला सुरू ठेवण्यासाठी महाभारतातील धृतराष्ट्राची भूमिका घेणाऱ्या सर्व जबाबदार यंत्रणांची देखील चौकशी होणे क्रमप्राप्त आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:18 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!