DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी येथे एका अल्पवयीन मुलाने त्याचे स्वतःच्या Gaba king x नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरती दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य व तसेच औरंगजेबासारखी वेशभूषा केलेला अर्धवट इसमाचा फोटो स्टेटस ठेवल्यामुळे त्या इसमावर साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील यांना गुप्त माहिती मिळताच सदर इसमा वरती साक्री पोलीस स्टेशनला गुरन २८८/२०२३ भा.द वि.क. ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई प्रसाद रोंदळ करीत आहे.
सदर गुन्हयातील मुलगा हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास समज देऊन त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे तरी धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की , विशेष करून मुलं व मुली त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल किंवा इतर सोशल मीडियाचा व प्रसार माध्यमाचा वापर शैक्षणिक विधायक कामासाठी करावा असे कोणतेही कृत्य करू नये जेणेकरून विविध समाजामध्ये धार्मिक व जातीय ते निर्माण होईल व शांततेचा भंग होईल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाल्यास त्यांचे भविष्याचे नुकसान होईल याची काळजी पालकांनी सुद्धा घ्यावी असे आवाहन साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांनी केले आहे.