नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळ्यात सर्व पत्रकारांनी एकजूट दाखवत आवळली वज्रमूठ



विविध संघटनांनी एकजूट दाखवून संरक्षण कायद्याची केली होळी

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – संदीप अहिरे
धुळे :- राज्यात पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना त्याची अमलबजावणी होत नाही. या निषेधार्थ धुळ्यात पत्रकारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवत या संरक्षण कायद्याची होळी करून रोष व्यक्त केला. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कायदयाची सक्त अमलबजावणी आणि आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ही केली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या पुढाकाराने विविध १८ संघटनांनी एकत्र येऊन आज १७ ऑगस्ट रोजी राज्यभर एकाच दिवशी या संरक्षण कायद्याची होळी करून आंदोलन केले. धुळ्यात मराठी पत्रकार परिषेदेशी संलग्न पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या पुढाकाराने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ,भारतीय पत्रकार संघ , खान्देश पत्रकार संघ , धुळे तालुका मराठी पत्रकार संघ , जनग्रामीण पत्रकार संघ , व्हॉइस ऑफ मीडिया , यांच्यासह इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रतिनिधी , छायाचित्रकार यांनी धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यानजीक एकत्र येऊन आपली एकजूट दर्शवली.बाबासाहेबाना पुष्पहार अर्पण करून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा , हल्ले करणाऱ्यांचा आणि कायदयाची अमलबजावणी न करणाऱ्या सरकारच निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या . पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून पत्रकारांनी आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची भेट घेऊन चर्चा केली.पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत कायद्याची सक्त अंमलबजावणी झाली पाहिजे. पाचोऱ्याच्या घटनेत पत्रकारास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आ. किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द व्हावे, अश्या मागण्या करून निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाला प्रा. अनिल चव्हाण , मनोज गर्दे ,देवानंद अहिरे, अतुल पाटील, राजेंद्र गर्दे, गोपी लांडगे , बापू ठाकर , नत्थू गुजर ,अरुण पाटील , रोहिदास हाके, दिलीप विभांडीक , रवींद्र इंगळे , प्रभाकर सूर्यवंशी , राजेंद्र सोनार , शैलेश साळे , चुडामण पाटील , मिलिंद बैसाणे, सुनील पाटील, रणजित शिंदे , गोरख पाटील ,निंब मराठे,किशोर पाटील , अजय भदाणे , शिवाजी पाटील , सतीश भावसार , गजेंद्र पाटील , भटू पाटील , विशाल पाटील, राकेश गाळनकर, विठोबा माळी , दीपक देवरे , उमाकांत पाटील, प्रमोद वाणी , अमोल पाटील , पी.एल.पाटील , हेमंत जगदाळे , मनिष मसोळे , धनंजय गाळनकर , बी.के. सूर्यवंशी, धनंजय दीक्षित , नितीन इंगळे, दिगविजय गाळणकर, योगेश इशी, चंद्रकांत महाजन , महेंद्र येवले , भरतसिंग राजपूत, उमेश कढरे, जॉनी सर , मुरलीधर जाधव, सचिन बागुल , रामकृष्ण पाटील , रमेश बोरसे , संजय देवरे, संदीप अहिरे , रमेश करणकाळ , एम.जे. मकासरे यांची उपस्थिती होती
विशेष म्हणजे या आंदोलनासाठी मालेगाव येथून महाराष्ट्र रक्षक न्यूजचे युसूफ पठाण, खान यांची उपस्थिती होती. तसेच हेमंत मदाने, योगेंद्र जुनागडे, आशुतोष जोशी, प्रा. जसपाल सिसोदिया, राजेंद्र शर्मा, निखिल सूर्यवंशी, विलास पवार, संतोष मासोळे नितीन जाधव, निलेश भंडारी, निलेश बोरसे , धर्मेंद्र जगताप राम निकुंभ , प्रल्हाद साळुंके मुख्य संपादक सा पोलीस व्हिजन धुळे यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे कळविले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:01 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!