DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – योगेश कर्डिले
नाशिकः – चांदवड पोलिसांना दिनांक 18 ऑगस्ट रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर रात्री गस्ती दरम्यान एक वाजेला मारुती स्वीफ्ट कार क्र. एमएच 04 ईएस 8281 गोई नदीच्या पुढे संशयितरित्या उभी आढळून आल्याने पोलिसांनी विचारपूस केली असता कार मधील दोघांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांनी कारची झडती घेतली असता, स्वीफ्ट कारमधे 6 किलो गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघ संशयीतांना 6 किलो गांजा, मारुती स्वीफ्ट कारसह रोकड, दोन भ्रमणध्वनी असा एकूण 4 लाख 66 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सदर कार पोलीस हवालदार बाळू सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदिप आजगे यांना आढळून आली त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सदर कार बद्दल माहिती दिली असता वरिष्ठ अधिकारी याबाबतची माहिती मिळताच चांदवडचे प्रभारी पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोलीस हवालदार विजय जाधव, अमोल जाधव, पोलीस नाईक चेतन बागल, दिनेश सूळ, पो.कॉन्स्टेबल विक्रम बस्ते, चंद्रकांत पवार, प्रदिप सोळंकी, विनोद लोखंडी आदींनी तातडीने घटनास्थळी जाऊन दोघा संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्या कारच्या मागील डिक्कीत असलेला 36 हजार रुपये किमतीचा गांजा, 4 लाख 15 हजार रुपये किमतीची मारुती स्वीफ्ट कार, 6 हजार 400 रुपये रोख, 9 हजार 500 रुपये किमतीचे दोन भ्रमणध्वनी असा एकूण 4 लाख 66 हजार 900 रुपयांची मुद्देमाल जप्त केला असून संशयीत मोहम्मद आरीफ अब्दुल रहिम (43, रा. इस्लामपुरा, मालेगाव) व हुजाफा मलिक जावेद अहमद (23, मालेगाव) यांना अटक केली आहे. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भानुदास नऱ्हे करीत आहेत.



