नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रामेश्वर संगमावर कावड यात्रेसाठी गेलेले एरंडोलचे तीन नवयुवक नदीत पडून बुडाले

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – उमेश महाजन


एरंडोल – एरंडोल येथील तिन नवयुवक कावड यात्रेनिमित्त श्रावण सोमवार असल्याने रामेश्वर येथे संगमावरील पाणी घेण्यासाठी गेली होती. यादरम्यान तीन तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली असुन दोन तरुणाचे मृतदेह सापडले असुन एकाचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटना स्थळावरील गर्दी


श्रावण सोमवार निमित्त जिल्ह्यातील महादेव मंदीरात विविध कार्यक्रम साजरे होत आहे. अनेक भाविक भक्त कावड यात्रेचे आयोजन करून महादेव मंदीरावर दर्शनासाठी जात आहे. या अनुषंगाने एरंडोल शहरातील सुमारे १५० तरूण हे सोमवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजता शहरातील भगवा चौक येथून कावड यात्रा निघाली तसेच खोल महादेव मंदिरात काकड आरती करुन पायी कावड यात्रेद्वारे भाविक जळगाव तालुक्यातील श्री. क्षेत्र रामेश्वर येथील गिरणा, तापी व अंजनी या त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदीरावर दर्शनासाठी व संगामावरील पाणी आणण्यासाठी गेले होते. तसेच यावेळी सर्व भक्तांनी संगमावरिल पाण्यात अंघोळ करुन महादेवाचे दर्शन घेतले. याप्रसंगी सागर अनिल शिंपी (२५), अक्षय प्रवीण शिंपी (२१) व पियूष रविंद्र शिंपी (२०) हे तिन तरुण पाण्यात बुडल्याचे सर्वांच्या लक्षात आले. तिघ तरुण हे एकाच परिवारातील असुन सागर शिंपी हा एकुलता एक मुलगा होता व तो बी. फार्मसी ला शिक्षण घेत होता. अक्षय व पियूष हा आय. टी.आय. चे शिक्षण घेत होते. दरम्यान सदर युवकांचा शोध घेण्यात आला असता यात दोघांचे मृतदेह आढळले आहेत. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे समोर आले आहे. पट्टीचे पोहणाऱ्या तरूणांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध घेणे सुरू असल्याचे माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीत उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहांचा शोध सुरूच आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांशी संपर्क केला असता त्यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे.
दरम्यान एरंडोल येथील रामेश्वर तालुका जिल्हा जळगाव येथे झालेल्या दुर्दैवी घटने उबाठा शिवसेना तर्फे उद्या एरंडोल बंदचे आवाहन करण्यात आले असून तरी उद्या दिनांक 22 /8 /2023 रोजी सर्व व्यापारी बंधू व व्यावसायिक यांना प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आवाहन शहर तालुका व जिल्हा शिवसेना उबाठातर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:17 am, January 13, 2025
temperature icon 20°C
साफ आकाश
Humidity 45 %
Wind 6 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!