DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- नारायण कांबळे
कोल्हापूर : संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अण्णासाहेब विभुते विद्या मंदिर प्राथमिक शाळा, धरणगुत्ती, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर संस्थेचे अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी यांनी संस्थेचे इमारतीचे भाडे देण्यासाठी संस्थेतील शिक्षिकेकडे एका महिन्याचा पगार मागितला तेही तब्बल 95,577 रुपये मागितले, तक्रारदार यांना ते पैसे द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्या तक्रारीचे दि.17/07/2023 रोजी पडताळणी करण्यात आली. सविस्तर वृत्त असेकी तक्रारदार ह्या संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अण्णासाहेब विभुते विद्या मंदिर प्राथमिक शाळा, धरणगुत्ती. तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आरोपी नं.01)अजित उद्धव सूर्यवंशी संस्था अध्यक्ष यांनी संस्थेच्या इमारतीच्या भाड्यापोटी एप्रिल महिन्याच्या (95,577 रुपये) इतक्या वेतन रकमेची लाच स्वरूपात मागणी करून ती लाच रक्कम दोन हप्त्यात देणेबाबत सांगून आणि तक्रारदाराने ती रक्कम न दिल्याने त्यांची वेतन वाढ रोखण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्यावर दबाव निर्माण करून वेतनवाढ रोखण्याची भीती देवून सदरची लाच रक्कम संस्थेचे मुख्याध्यापक आरोपी क्रमांक 02) मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील यांच्याकडे देणेस सांगितले असता यांनी सदरची रक्कम सदरहू शाळेतील शिपाई 03)अनिल बाळासो टकले यांच्याकडे देण्यास सांगून त्यांनी ती स्वीकारली असता त्याना रंगेहात पकडुन वरील तीनही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सुरू होती.
दिनांक :- 23/08/2023रोजी सापळा पथक :- श्री सरदार नाळे पोलीस उपअधीक्षक. ला.प्र.वि.कोल्हापूर, पो. उप नि. बम्बर्गेकर, सपोफो प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने, पोलीस कॉन्स्टेबल मयूर देसाई, रुपेश माने, संदीप पवार, पोना/सचिन पाटील, मपोकॉ/पुनम पाटील, चालक हेड कॉन्स्टेबल गुरव आणि हेड कॉन्स्टेबल अपराध. यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला.
सापळा यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी :-1)मा. श्री अमोल तांबे,पोलीस अधीक्षक लाप्रवि,पुणे (मोबा.9922100712) 2) मा. श्रीमती शितल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवी पुणे (मोबा.9921810357)
3) मा.श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे. (मोबा. 9607323232) यांचे मार्गदर्शन लाभले.
तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तसेच लाचलुचपत विभागास तक्रार दिल्याने आपले शासकीय काम होणार नाही अशी कोणीही भीती बाळगू नये… तरी आपली तक्रार असल्यास आपण तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
सरदार नाळे(पोलीस उप अधीक्षक,
लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,कोल्हापूर.)
मो.नं. 9673506555.
(कार्यालयीन क्रमांक/0231- 2540989)
कोल्हापूर कार्यालय मेल आयडी(dyspacbkolapur@gmail.com) यावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता.
*@ टोल फ्रि क्रं. 1064*(आपण दिलेल्या तक्रारीबाबत आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल.)



