DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️.
कोल्हापूर : जन ग्रामीण पत्रकार संघाच्या कोल्हापूर येथील आढावा बैठकित अध्यक्ष शैलेंद्र साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे, कोल्हापूर जिल्ह्याचे दक्ष जिल्हाध्यक्ष विजय सनदी, अनिल डाके, संदीप सकट, सोमनाथ मकवाने, कुमार सावंत, व पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांची कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थिताना अध्यक्ष शैलेंद्र साळे यांनी संबोधले, जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या, समस्यांचे निराकरण करण्यात आले. जन ग्रामीण पत्रकार संघाचे आगामी निवासी प्रशिक्षणा संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे यांनी आगामी काळातील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमा संदर्भात रूपरेषेबाबत सविस्तर चर्चा करून पदाधिकारी व सदस्यांचे अभिप्राय नोंदवून घेण्यात आले.

राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे यांनी कार्यक्रमात कोणकोणत्या विषयांवर प्रशिक्षण घेण्यात येईल याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी नवनियुक्त कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांनी जन ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांचे त्यांच्या नियुक्ती बद्दल आभार मानले व पत्रकार संघाचे कामकाज हे प्रगतशील मार्गाने नेण्याबाबत आश्वासित केले.

कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विजय सनदी यांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करून पत्रकारांना विविध प्रशिक्षणामुळे ज्ञानात भर पडणार आहे. या बाबत अध्यक्ष कार्याध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांनी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले.
जन ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय सनदी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.नागेंद्र जाधव, दर्शन पोलिस टाइम हातकणंगले तालुका प्रतिनिधी अनिल डाके, चंदगड प्रतिनिधी संदीप संकट, दर्शन पोलिस टाइम शिरोळ तालुका प्रतिनिधी सचिन कोळी, कोल्हापूर प्रतिनिधी नारायण कांबळे, शिरोळ प्रतिनिधी कुमार सावंत, कागल प्रतिनिधी सोमनाथ मकवाने, राजेश कांबळे, अंकुश दिंडे, संजय दिंडे, गुन्हे अन्वेषण प्रतिनिधी मारूती गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी केला.



