नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अकोला सायबर पोलीस स्टेशन, पो. नि. विजय नाफडे यांची उत्तम कामगिरी



सायबर पोलीस स्टेशन, अकोला यांनी ऑनलाईन फसवणूकीतील ६, ३४,०००/- रू. रक्कम परत मिळवून दिली.

आजच्या युगात इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दैनंदिन जीवनातले बरेच व्यवहार आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून पार पाडले जातात. जसे की आर्थिक व्यवहार, बँकिंग, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय व जनसंपर्क इत्यादी. इंटरनेट माध्यमाने मानवी जीवन सुलभ झाले आहे. हे जितके खरे तितकेच याच्या वापराबाबतच्या अपुऱ्या माहितीने ते धोक्यातही आले आहे. सायबर गुन्हेगार याच उणीवांचा फायदा उठवून इतरांचे आर्थिक व सामाजिक नुकसान करतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर सुरक्षितरित्या करणे हि काळाची गरज आहे.

अशाच प्रकारची एक घटना अकोट येथे घडली. तक्रारदार हे नेहमी ऑनलाईन पध्दतीने खरेदी करतात परंतु एक दिवस त्यांना अनोळखी इसमाचा फोन आला त्या व्यक्तीने सांगितले की, ‘तुमच्या नावाचे एअरपोर्टवर पार्सल प्राप्त झालेले आहे. सदर पार्सल सोडवण्याकरिता आपल्याला चार्जेस द्यावे लागतील. तसेच तुमचे पार्सल हे कस्टम डिपार्टमेंटने तपासले त्यामध्ये अंमली पदार्थ असल्याचे दिसत आहे त्यानुसार तुमच्यावर केस झालेली आहे’ असे सांगुन बनावट एफ.आय.आर. कॉपी देखील पाठवली. तक्रारदार हे सदर फोन कॉलला घाबरून गेले फसवणुक करणाऱ्या व्यक्तीने फोनवर सांगितल्या प्रमाणे तक्रारदार यांनी ऑनलाईन पध्दतीने टप्प्या-टप्प्याने विविध बँक खात्यात एकुण ६, ३४,०००/- रूपये पाठविले. नंतर तक्रारदार यांनी सदर व्यक्तीला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना समजले की, आपल्याला आलेला अनोळखी फोन कॉल हा फसवा असुन आपली आर्थिक फसवणुक झालेली आहे. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन अकोट शहर येथे संबंधित घटनेची माहिती देवुन तक्रार दिली. त्याअनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन, अकोला यांच्याकडे सदर तक्रार प्राप्त झाली. सायबर पोलीस स्टेशन, अकोला यांनी तक्रारदार यांनी केलेल्या ऑनलाइन व्यवहाराबाबत तात्काळ माहिती घेवुन संबंधीत बँक सोबत पत्रव्यवहार करून सदर खाते गोठविण्यात आले. त्यानुसार मा. न्यायालयामार्फत सुपृतनामावर फसवणुक झालेली एकुण ६,३४,०००/- रू. संपुर्ण रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात सायबर पोलीसांना यश आले.

सदर कारवाई मा. संदिप घुगे, पोलीस अधीक्षक, अकोला व मा. अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या मार्गदर्शनात पो. नि. विजय नाफडे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस अंमलदार गजानन केदारे, पोलीस अंमलदार अतुल अजने, पो. अंमलदार आशिष आमले, पो. अंमलदार कुंदन खराबे, पोस्टे सायबर, अकोला यांनी केली.

तरी नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, अनोळखी फोन कॉल्सवर कोणतीही वैयक्तीक माहिती शेअर करू नये तसेच खात्री केल्याशिवाय ऑनलाईन आर्थिक व्यवहार करू नये. आपल्या बँक खात्यांविषयी, केडीट कार्ड किंवा ए. टी. एम. कार्डबाबत तसेच इतर वैयक्तीक माहिती कोणालाही फोनद्वारे देवु नये. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक अथवा अॅप्लीकेशन कोणी व्यक्तीच्या सांगण्यावरून डाउनलोड करू नये. अशाप्रकारच्या फसव्या प्रकारापासुन सावध रहावे व आपली फसवणुक टाळावी.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:26 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!