नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

टिप्पर गँगचा सूत्रधार गौरव पाटील याला अटक

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी योगेश गवळे

नाशिकः सिडकोतील ‘टिप्पर’ गँगचा सुत्रधार गौरव उमेश पाटील (२३,रा.वृंदावननगर, अंबड) याच्या अखेर पोलिसांनी पुण्याच्या चाकणमधून मुसक्या बांधल्या. याचा मुळ हस्तक ओम्या खटकी उर्फ ओमप्रकाश पवार याने गुरूवारी (दि. २४) जुन्या सिडकोत संदीप आठवले याचा खून केल्याची घटना समोर आली होती. ओम्या खटकी हा या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या घटनेनंतर त्याचा ‘बॉस’ गौरव पाटील याने नाशिकमधून धूम ठोकली होती. अंबड पोलिसांचे गुन्हे शोध पथक त्याच्या मागावर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुण्याच्या चाकणमधून पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.


अंबड येथे सोशल मीडियावरील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओचा राग मनात धरून ओम्या खटकी याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने भर चौकात संदीप आठवले याचा वचपा काढला. यानंतर पोलिसांनी संशयित ओम्यासह सहा संशियत साथीदारांना बेड्या ठोकल्या. यानंतर त्यांचा प्रमुख सुत्रधार गौरव पाटील याचा पोलिस शोध घेत असतानाच तो नाशिकमधून निसटला होता. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे आलेला प्रस्तावानुसार कारवाई करत त्यांनी त्यास झोपडपट्टी गुंड व अत्यावश्यक वस्तूंच्या काळाबाजारास प्रतिबंध कायद्यान्वये मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे फर्मान सोडले. यानंतर अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे उपनिरिक्षक संदीप पवार, जनार्दन ढाकणे, समाधान चव्हाण यांना त्याच्याविषयीची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांना याबाबत कळवून तत्काळ पुण्याच्या दिशेने रवाना झाले. या पथकाने चाकणमधील नानेकरवाडीत सापळा रचला. तेथे मोठ्या शिताफीने सराईत गुन्हेगार गौरवपाटील यास ताब्यात घेत नाशिक गाठले. संशयित सराईत गुन्हेगार याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:58 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!