नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वडगांव निंबाळकर
पोलिसांची उत्तम कामगिरी, दोन दुचाकीसह चोरास केली अटक

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – सोमनाथ पारसे

बारामती :- वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 17 /8 /2023 रोजी रात्री 9:00 ते सकाळी 9:30 वाचे सुमारास कारखेल ता. बारामती गावाचे हद्दीत जगदंबा हॉटेलचे समोरचे मोकळे पार्किंग मधून काळे रंगाची हिरो होंडा कंपनीची सी. डी. 100 मोटर सायकल एम एच 42 जे 7802 ही अज्ञात चोरट्याने चोरी केली वगैरे फिर्यादीवरून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेंशन गु.रं.नं. 536/2023 भादवी 379 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याचा तपास हा गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता किशोर सुरेश भापकर वय 33 वर्ष रा. भापकर वस्ती कारखेल ता. बारामती पुणे याने सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याने आणखी अशाच प्रकारचा वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 537/2023 भादवी 379 हा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्याचे कामे आरोपीस अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेल्या दोन मोटरसायकल अशा एकूण 75,000/-रु किंमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे.
1) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.536/2023 भादवी 379
2) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.537/2023 भादवी 379
सदरचे कामगिरी मा. अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अनंत भोईटे अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग बारामती, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सहाफौज दत्तात्रय जाधव, भाऊसाहेब शेंडगे, पोहवा अनिल खेडकर, रुपेश साळुंखे, पोशि किसन ताडगे, पोपट नाळे, अमोल भुजबळ, कारखेल गावचे पोलीस पाटील सचिन जगताप, पोलीस मित्र अंकुश भोसले, पोलीस मित्र अजित नलवडे यांनी केलेली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:56 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!