DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – उमेश महाजन
मुबई : केंद्रातील भाजपाचे जुलमी व अत्याचारी सरकार सन २०२४ च्या निवडणुकीमध्ये हाणून पाडण्यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची “इंडिया_ आघाडी” स्थापन करण्यात आली असून आघाडीची तिसरी बैठक मुंबई येथे ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी पार पडत आहे यानिमित्ताने एरंडोल तालुका व महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उबाठा गट व राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मिठाई वाटप करण्यात आली व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच महाविकास आघाडीतील उपस्थित डॉ.फरहाज हुसैन बोहरी, दशरथ भाऊ महाजन, डॉ राजेंद्र देसले, प्रा.आर एस पाटील, राजू भाऊ चौधरी, शेख कलीम हुसेन, असलम भाऊ पिंजारी, शेख आरिफ दादा, योगेश भाऊ रोकडे, संजू भाऊ महाजन, प्रमोद महाजन, गजानन महाजन, दीपक भाऊ पाटील, सैय्यद अंजुम, डॉ प्रशांत पाटील, कालू शेख, शेरवानी सेठ, मोहसीन शेख, रहीम शेख इत्यादी अनेक पदधिकारी उपस्थित होते.