नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सटाणा पोलीस स्टेशनच्या आवारातील देवमामलेदार उद्यानाची दुरवस्था

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रशांत कोठावदे


सटाणा: पोलीस स्टेशनच्या बाहेरील देवमामलेदार उद्यानाची काही महिन्यात वाईट अवस्था झाली आहे. तेथे गवत वाढले आहे, येथे उद्यान होते, हेही लक्षात येत नाही, अशी त्याची अवस्था झाली आहे.



सटाणा पोलीस स्टेशनच्या बाहेरील बाजूस जप्त केलेली वाहने पडलेली असायचे, मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेलं होते त्यामुळे पोलीस स्टेशन व तहसिलला येणाऱ्या प्रत्येकाला विद्रुपीकरणाचे दर्शन होत असे. येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन तत्कालीन पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या संकल्पनेतून व शहरातील दानशुर व्यक्तींच्या माध्यमातून ह्या जागेवर सूंदर असे देवमामलेदार उद्यान साकारण्यात आले आहे. परंतु सध्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्या जागेचे पुन्हा विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील काही काळात पोलीस स्टेशनला कर्मचारी संख्या कमी असतांना देखील अधिकारी व कर्मचारी आपल्या कामातून थोडा वेळ देत त्या गार्डन मध्ये फेरफटका मारत लक्ष देत असे परंतु सध्या आधी पेक्षा जास्त कर्मचारी असुन देखील उद्यानाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. विशेष बाब म्हणजे ह्या उद्यानात सध्या गुन्ह्यात जप्त केलेली वाहने कोंबली गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ज्या व्यक्तीने ह्या उद्यानाच्या निर्मितीसाठी हातभार लावला असेल त्यांना आजचे दृश्य बघुन नक्कीच दुःख होईल. ह्याच उद्यानात छोटी छोटी फुलांची झाडे लावण्यात आली होती एखाच्या कर्मचाऱ्यांचा वाढदिवस किंवा सेवानिवृत्त असेल त्यांना देखील ह्याच उद्यानातील फुले शुभेच्छा म्हणून काही वेळा दिली गेली आहेत. परंतु सध्या उद्यानाचे गोडावून झाल्याचे चित्र दिसत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:57 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!