नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दहिवेल येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी; साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अकिल शहा


साक्री : साक्री तालुक्यातील दहिवेल येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली,राकेश विश्वास खैरनार रा.शकुंतला पार्क, दहीवेल वय 38 वर्ष व्यवसाय वेल्डिंग कामगार हे आपल्या आई- वडील, पत्नी व मुलाबाळांसह एकत्र राहतात वेल्डिंग दुकान चालवून त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवितात त्यांचे वेल्डिंगचे दुकान त्यांच्या घराच्या खाली असून घर वरच्या मजल्यावर आहे.
दिनांक ०३/०९/२०२३ रोजी दिवसभर काम करून दुकानात रात्री ११:०० च्या सुमारास त्यांचे दुकानाचे साहित्य नेहमीप्रमाणे दुकाना बाहेर ठेवले होते म्हणून त्यांनी दुकानाचा दरवाजा उघडा ठेवून झोपले पहाटे ०५:०० वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी हेमलता खैरनार सकाळी नेहमीप्रमाणे उठून घरात काम करण्यात जात असताना ते त्यांच्या पतीला(राकेश खैरनार) यांना उठवायला खाली आले तेव्हा राकेश खैरनार यांनी त्यांचा फोन शोधला असता तो दिसून न आल्यामुळे त्यांच्या पत्नीच्या मोबाईल वरून संपर्क साधण्यासाठी त्यांच्या पत्नीचा ही मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला असता तोही न मिळून आल्यामुळे तेव्हा त्यांचे लक्ष बेडरूम मध्ये असलेल्या कपाटाकडे गेले असता लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडे दिसले त्यातील सामानाची उचकपाचक करून सामान अस्ताव्यस्त पडलेले कोणीतरी अज्ञात इसमाने घरात मुख्य दरवाजा मधून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरून नेले त्याचे वर्णन खालील प्रमाणे चोरी .

१)२००००/-रू. रोख त्यात १०० व ५०० रू चलनी नोटा.
२)१०००/- रू. किमतीचे सोन्याची एक नाकातील नथ अर्धा ग्रॅम वजनाची जु.वा.कि.अ.
३)१३००/- रू किमतीचे सोन्याचे पेंडल ७०० मिली ग्रॅम वजनाचे जु.वा.कि.अ.
४)३०००/- रू. किमतीचे चांदीचे ब्रेसलेट १० भार जु.वा.कि.अ.
५)३००/- पायातील चांदीचे जोडवे ०१भार जु.वा.कि.अ
६)८०००/- रू किमतीचा सॅमसंग कंपनीचा M11मोबाईल जु.वा.कि.अ
७)१०००० रू किमतीचा OPPO A37 मोबाईल जु.वा.कि.अ.
एकूण ४०,६०० रू
सदर इसमांचा त्यांनी आजूबाजू शोध घेतला असता त्यांना काही अंतरावर हॉटेल शिवम जवळ असलेल्या किशोर माळी रा.दहिवेल ता.साक्री जि. धुळे यांच्या मालकीचे खळ्यात देखील चोरी कळाले असता तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी बघितले असता त्या खळ्यात असलेले शक्तिमान कंपनीचे रोटर देखील कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या संमतीशिवाय खळ्याचे गेट तोडून आत प्रवेश करून चोरून नेले त्याचे वर्णन खालील प्रमाणे
१)२००००/- रू किमतीचे शक्तिमान कंपनीचे रोटर जु.वा.कि.अ.(किशोर दगा माळी यांचे) एकूण ६०,६००.
सदर घटनेची फिर्याद किशोर माळी यांनी साक्री पोलीस ठाण्यात दाखल केली असून साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास असई राजू जाधव करीत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:19 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!