नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलकावर केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ, साक्री शहर कडकडीत बंद

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा

साक्री: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर प्रशासनाकडून लाठीमार केल्याचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी ११ वाजता साक्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयापासून मोर्चाला सुरूवात करून पुढे गोल्डी हॉटेल पॉईंट, बस स्टँड मार्गे बाजारपेठेतून काढून तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेनंतर रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली होती या बैठकीत मंगळवारी साक्री तालुका बंद चा निर्णय घेण्यात आला होता. या बंदला सर्व व्यापारी संघटना सर्व व्यावसायिक संघटना यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे साक्री शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी कडकडीत बंद पहायला मिळाला तर या बंदमध्ये सहभागी होऊन तालुक्यातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी सहकार्य केल्याचे दिसून आले.
साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या नेतृत्वाखाली साक्री पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
साक्री चे तहसीलदार सुरेश सोनवणे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने मराठा समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्ट पासून मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत या उपोषणाला राज्यभरातून समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनात गेल्या तीन दिवसांपूर्वी या आंदोलन स्थळी पोलिसांनी अमानुषपणे केला यात हजारो समाज बांधव महिला भगिनी गंभीर जखमी झाले असून हा संपूर्ण प्रकार अतिशय संताप जनक आणि चीड आणणार आहे अशावेळी या आंदोलनासाठी मार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी याच आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या शेकडो निरपराध तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून हे सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत व तसेच आजवर मराठा आरक्षण मागणीसाठी करण्यात आलेल्या विविध आंदोलनातून दाखल सर्व गुन्हे शासनाने विना मागे घ्यावेत अशा प्रमुख मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत अन्यथा भविष्यकाळात मराठा समाजातर्फे आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी साक्री तालुक्यातील सकल मराठा समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!