नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दुचाकीसह तीन चोरांना नाशिक गुन्हेशाखेने ठोकल्या बेड्या

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- बाळासाहेब सोनवणे

नाशिकः नाशिक जिल्हयातील आता पावेतो उघडकीस न आलेल्या चोरीच्या मोटारसायकल चोरीच्या गु्न्हयांचा तपासकामी स्थानिक गुन्हेशाखेच्या विशेष पथकांची निर्मीती करण्यात आलेली असुन त्यातील पोनि/संजय गायकवाड, असई दिपक अहीरे, असई शांताराम नाठे, विनोद टिळे, गिरीष बागुल,अनुपम जाधव, प्रविन गांगुर्डे असे मालेगाव शहरात मोटारसायकल चोरी करनारे आरोपीतांचा शोध घेत असतांना पोनि/ हेमंत पाटील स्थानिक गुन्हेशाखा यांना माहीती मिळाली की १ ईसम हा मौसम पुल येथे बुलेट मोटारसायकल विक्री करण्यासाठी येत आहे त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव येथील मौसम पुल येथे सापळा रचुन बुलेट विक्री करण्यासाठी आलेल्या ईसमास ताब्यात घेतले त्याचेकडेस त्याचेकडे असलेल्या बुलेट मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दि ल्याने त्यास पोलीसी खाक्या दाखविल्या नंतर त्याने त्याचे नाव राज अनिल नेरकर रा. नागझिरी मालेगाव असे सांगितले व सदरची बुलेट मोटार सायकल फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याचा नाशिक येथील साथीदार सागर गणपत पवार याचे मदतीने मालेगाव शहरातील बाराबंगला भागातुन चोरली असल्याची कबुली दिली. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी त्यांचे मालेगाव येथे राहनारे साथीदार शोयेब अहमद अंसारी व कमलेश संतोष म्हसदे याचेसह बजाज पल्सर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांचे साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कारवाई मालेगाव शहर पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/हेमंत पाटील स्थानिक गुन्हे शाखा, पोनि/ संजय गायकवाड, असई दिपक अहीरे, शांताराम नाठे, पोह./विनोद टिळे, गिरीष बागुल, अनुपम जाधव, प्रविण गांगुर्डे व तांत्रिक विश्लेषन शाखेचे पोना/ प्रदीप बहीरम, हेमंत गिलबिले, चालक सुनिल गंधे यांनी केलेली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!