नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कॅम्प येथील श्री संत ज्ञानेश्वर शाळेत “शिक्षक दिन” उत्साहात साजरा.

DPT NEWS NETWORK 🗞️✍️

वार्ताहर:- गौतम जगताप
मालेगाव दि.६ सप्टेंबर

०५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती ‘सर्वपल्ली राधाकृष्ण’ यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि.5 सप्टेंबर रोजी मालेगाव कॅम्प येथील श्री.संत ज्ञानेश्वर सां.प्र.शि.मंडळ संचलित प्रि-प्रायमरी/प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला.

“शिक्षक दिन” या कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी आखली तसेच इ.५वी ते इ.६ वीचे विद्यार्थ्यांनी “शिक्षकांची भूमिका” बजावली. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी खालच्या वर्गांना जाऊन विद्यार्थ्यांच्या समोर वर्ग घेतले विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सर्वांनाच आनंद वाटत होता.

दुपारनंतर सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात जमले. शिक्षक दिनाचे सांगता म्हणून एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले, शिक्षकांचे आभार मानले, शिक्षकांचे महत्त्व हे विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे असते. हे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या एक दिवसाच्या अनुभवातून स्पष्ट केले. याप्रसंगी उपस्थित शालेय समितीचे चेअरमन श्री. सुरेश चौधरी व शाळेचे मुख्याध्यापक सागर शिंदे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीने श्री.संत ज्ञानेश्वर सेमी इंग्लिश शाळेचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!