शहापुर गुन्हे शोध पथकाची कारवाई, मोहरक्यासह 14 जण जेरबंद
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर – खंडणी, अपहरणासह दरोड्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या जर्मनी गँगला शहापुर गुन्हे शोध पथकाने गजाआड केले आहे. या कारवाईत पोलीसांनी मोहरक्यासह 14 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोकडसह दोन चारचाकी वाहन, दोन स्कूटर, एक मोटारसायकलसह गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे हत्यारे, असे लोखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्यादी बिल्डर यांना काही दिवसांपूर्वी जर्मनी गँगने रात्री पावणे अकराच्या समारास म्हसोबा मंदिराजवळ अडवून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या हातातील 9 तोळ्याच्या 2 सोन्याच्या आंगठ्या, 2 तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, साडे आठ तोळ्याची गळ्यातील सोन्याची चेन व हातातील राडो कंपनीचे घड्याळ टोकन म्हणून जबरदस्तीने काढुन घेतले. फिर्यादीस जिवंत सोडायची सेटलमेंट म्हणून त्यांच्याजवळ असलेली 4 लाख रोख रक्कम असे एकुण 11,35,000/- रूपयेचा मुदेमाल जबरदस्तीने काढून घेतले. तसेच फिर्यादीस पेट्रोलने जाळून मारण्याची धमकी देवून त्यांना कोयत्यांचा धाक दाखवून फिर्यादीस महापुरुषांबददल घृणास्पद बोलायला लावून त्याचे रेकॉर्डींग मोबाईलमध्ये करून घेतले. जर्मनी गॅगच्या खर्चासाठी दर महिन्याला 20 हजार रुपये खंडणी म्हणून द्यायचे सांगितले. खंडणी नाही दिली तर फिर्यादी व त्याच्या परिवाराला संपवण्याची धमकी दिली. तसेच पोलीसांकडे तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू, असे धमकावले. याबाबत फिर्यादी सरदार अमिन मुजावर (वय 48, व्यवसाय-रियलइस्टेट, रा. गैवान रेसिडेन्सी, म्हसोवा मंदीर मागे, शाहापूर, ता. हातकणंगले) यांनी शहारपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
यासंदर्भात कोल्हापूर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस उपनिरीक्षक दिपक माळी, प्रमोद भांगरे, अविनाश मुंगसे, असिफ कलायगार, अर्जुन फातले, संतोष कांबळे, रविंद्र महाजन, शशिकांत ढोणे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवित, गुप्त बातमीदारांना सक्रीय करून जर्मनी गँगचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून 32 हजार 900 रुपये रोख, स्विफ्ट कार (एमएच 45 ए 2330) सुझूकी एक्सेस (एमएच 09 जीके 7206), सुझूकी कंपनीची कंनीची नव्याने आलेली इन्ट्रूडर कार (एमएच 10 डीके 6009) हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच 09 बीके 7956), सुझूकी एक्सेस (एमएच 09 जीएच 6616) तसेच गुन्ह्यात वापरलेलेे 4 कोयते हस्तगत केले असून रुप्या उर्फ रूपेश पंडीत नरवाडे (वय 23 वर्षे, रा. दत्तनगर, गल्ली नं. 13, कबनुर ता. हातकणंगले), आनंदा उर्फ आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी (वय 26 वर्षे, रा. अक्षय बार समोर, जवाहर नगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले), मेहबुब ईस्माईल उकली (वय 24 वर्षे, रा. सोमनाथ किराणा स्टोअरच्या मागे, जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले), सिध्द्या उर्फ सिध्दू जटाप्पा पुजारी (वय 22 वर्षे, रा. फकीर मळा, गल्ली नं. 3, जवाहरनगर, इचलकरंजी, ता.हातकणंगल)े, आरबाज महंमदहनिफ शेख (वय 24 वर्षे, रा. फकीर मळा, गल्ली नं. 3, जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, आशदुल्ला हारूण जमादार (वय 25 वर्षे, रा. भोनेमाळ, सरस्वती हायस्कूल, आलोक सायझींग मागे, इचलकरंजी, ता. हातकणंगले), नाना उर्फ पार्थ समाधान ढाले (वय 17 वर्षे 28 दिवस (विधी संघर्षप्रस्त बालक) रा. पाटील वसाहत, कोरोची, ता. हातकणंगले), मोहम्मद कैफ आरिफ ईनामदार (वय 19 वर्षे, रा. नॅशनल हायस्कुल मागे, वीर गल्ली घर नं. 1898 जवाहर नगर, इचलकरंजी), गौरव शरद मरडे (वय 27 वर्षे, रा. बंडगर मळा, आरजीएम हॉस्पीटल जवळ, इचलकरंजी सध्या रा. पॅराडाईज हॉटेल जवळ, लक्ष्मी माळ, कवनुर, ता. हातकणंगले), रोहन प्रकाश मांडे (वय 23 वर्षे, रा. शास्त्री सोसायटी गल्ली नं. 4 भोने माळ, इचलकरंजी, ता.हातकणंगले), आदित्य राजेंद्र शेटके (वय 19 वर्षे, रा. नॅशनल हायस्कुल मागे, वीर गल्ली जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले), राज उर्फ चिन्या संजय सुर्यवंशी (वय 20 वर्षे, रा. इंदिरा कॉलनी, स्वामी अपार्टमेंट जवळ, जवाहरनगर, इचलकरंजी), अक्षय अशोक घाडगे (वय 21 वर्षे, रा. मदन मोरे यांच्या कारखान्याजवळ, लिगाडे मळा, इचलकरंजी), रोहन सुरेश गेजगे (वय 24 वर्षे, रा.महात्मा गांधी हौसिंग सोसायटी, भाग्यरेखा टॉकीज जवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि.कोल्हापूर) या सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.



