नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेवाळी गावाजवळील नवीन बायपास ठरत आहे मृत्यूचा महामार्ग

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी अखिल शहा


धुळे : काही महिन्यांपूर्वी नागपूर- सुरत राष्ट्रिय महामार्ग क्रमांक सहा वरील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी गावाजवळील नवीन बायपास मार्गे एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली असून या नवीन बायपास मार्ग वर अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे अशा वेळी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.


आज 13 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ओडिसा कडून गुजरात राज्याकडे जाणारा कंटेनर वाहन क्रमांक RJ 04 GB 3659 व गुजरात राज्याकडून कडून धुळ्याकडे डिझेलचे टँकर घेवून जाणारे वाहन क्रमांक GJ 15 AT 8799 मध्ये जोरदार धडक होवून अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की कंटेनर मधील वाहक जागेवरतीच ठार झाला तर दोन लोक गंभीर झाले असून जखमीना शेवाळी गावातील नागरिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय साक्री येथे हलविण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की काही अंतरावर असलेल्या शेवाळी गावातील नागरिक सकाळ ची वेळ असल्याने झोपेतून उठून घटनास्थळी दाखल झाले त्यांना असे वाटले की जवळच उड्डाणपूल असून त्या उड्डाण पुलावरून एखादे वाहन पलटी झाले असेल असा मोठा आवाज आला होता. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, डिझेलचे टँकरला गळती लागल्यामुळे रस्त्यावर डिझेल वाहत होते, अशावेळी मोठी दुर्घटना घडू नये याची खबरदारी म्हणून नवीन बायपास मार्ग वाहतूक बंद करण्यात आली व पर्यायी मार्गे म्हणून शेवाळी गावावरील जून्या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!