नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पंचाळे येथे आधार कार्ड कॅम्प घेण्याची महेश थोरात यांची मागणी

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- बाळासाहेब सोनवणे


पंचाळे: पंचाळे येथे आधार कार्ड शिबीर घेण्यात यावा यासाठी पंचाळे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते महेश थोरात यांनी तहसीलदार, सिन्नर श्री. सुरेंद्र देशमुख यांना नुकतेच निवेदन दिले. पंचाळे परिसरातील अनेक नागरिकांची नवीन आधार कार्ड नोंदणी तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, आधार दुरुस्ती, आधार कार्ड आद्ययावत करणे याकामी गैरसोय होत आहे.

पंचाळे गावची लोकसंख्या जवळपास चार हजारापेक्षा जास्त आहे. गावात एकूण 3 विद्यालये असल्याने आजमितीस सुमारे दोन हजारापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे. आसपासच्या पिंपळगाव, श्रीरामपूर, मिठसागरे, सांगवी, सोमठाणे, रामपूर, उजनी, दहिवाडी या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी याठिकाणी येतात.

गाव परिसरातील नागरिकांना विविध शासकीय तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांसाठी आधार कार्ड अपडेट असणे अथवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आणि तत्सम कामांसाठी गावात आधार केंद्र नसल्याने गैरसोय होते. यासाठी पंचाळे या मध्यवर्ती ठिकाणी भविष्यात कायमस्वरूपी आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात यावे परंतू, तूर्तास किमान ३-४ दिवसीय मेळाव्याचे आयोजन केल्यास नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळून गैरसोय टळेल यासाठी पंचाळे गावचे ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांनी पंचाळे ग्रामस्थांसह तहसीलदार, सिन्नर सुरेंद्र देशमुख यांना भेटून निवेदन दिले. याप्रसंगी पंचाळे गावातून रेवळनाथ थोरात, शिवाजी तळेकर, नारायण थोरात, संदीप थोरात, प्रमोद थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आढावा घेऊन लवकरच सदरची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन तहसीलदार देशमुख यांनी दिले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!