DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – प्रा.नागेंद्र जाधव-
कोल्हापूर : पंचायत समिती चंदगड जि.कोल्हापूर येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात उप अभियंता वर्ग १ पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे (सद्या रा. हनुमाननगर बेळगाव.) यांना २५ हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदार हे पोट मक्तेदार, ठेकेदार असून मूळ ठेकेदार यांनी जलजीवन मिशन योजने अंतर्गत घुल्लेवाडी ता.चंदगड येथील नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे काम हाती घेतले असून केलेल्या कामाचे बिल मंजूर केले म्हणून उप अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे मंजूर केलेल्या १२ लाख रु.तील ३ टक्के दराने ३३००० रू. लाचेची मागणी केली. त्यांच्यातील तडजोडअंती २५००० रू लाच रक्कम आरोपी उप अभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडून स्वतः स्वीकारताना ए सी बी कोल्हापूर उपअधीक्षक सरदार नाळे, संजीव बांबर्गेकर पो. हे कॉ. श्रेणी पोसई, विकास माने, सुनील घोसाळकर पो ना. सचिन पाटील म. पो. काँ. पुनम पाटील चा.पो हे कॉ. विष्णू गुरव आदी टीम ने गुरुवार दि.२८ सप्टेंबर २०२३ रोजी सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडण्यात यश मिळवले असून आरोपीविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारवाई नोंद केले आहे.



