विजय देवरे यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे…
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे :- वलवाडी परिसर महानगर पालिकेत जाऊन पाच वर्ष होऊन देखील वलवाडी परिसरात विकास होताना दिसत नाही. ग्रामपंचायत असताना ज्या समस्या होत्या त्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरी तेथील समस्यांकडे लक्ष घालयाला प्रभागला कोणी वालीच उरले नाही असे चित्र समोर येत आहे. त्यामुळे प्रभागातील युवा कार्यकर्ता विजय देवरे यांना महानगर पालिकेच्या सभेत प्रभागातील समस्या मांडाव्यात असे वाटले व त्यांनी सभेत मांडलेले मुद्दे पुढील प्रमाणे १) प्रभाग क्रमांक १ मध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी व सेवा वस्त्या चा समावेश आहे , रहिवास असलेल्या ठिकाणांमधून एक नाला देखील आहे या नाल्यातून outlet चे पाणी वाहत असते, परंतु या नाल्याला कोणत्याही पद्धतीचे संरक्षण नाही संरक्षण नसल्यामुळे येथील लहान बालकांच्या जीविताला धोका आहे ही बाब महानगरपालिकेने लक्षात घेऊन लवकरात लवकर या नाल्याला संरक्षण भिंत बाधावी.
२) वलवाडी कॉलनी परिसराचा श्वास असणारा मुख्य रस्ता म्हणजेच परिवहन कॉलनीपासून ते अशोक नगर वडेल रोड पर्यंत हा रस्ता लवकरात लवकर गटारींसह तयार करण्यात यावा.
३) भोकर गावातील स्मशान भूमीची देखील दुरावस्था झालेली आहे, तसेच रस्त्यांची देखील दुरावस्था आहे, त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर स्मशानभूमीच्या व रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे.
४) भोकर पहिले ग्रामपंचायत असल्याकारणाने येथे गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात गावविहिरी आहेत, परंतु हे क्षेत्र महानगरपालिकेत समावेश झाल्यामुळे आता या विहिरींचा कोणत्याही पद्धतीचा उपयोग होत नाही परंतु याउलट येथे आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच अंगणवाडीच्या मागच्या बाजूला या विहिरी असल्यामुळे येथील लहान मुलांना देखील याचा धोका आहे. त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर या विहिरींना संरक्षण जाळी बसवावी अथवा या विहिरी बुजून टाकाव्यात. असे युवा कार्यकर्ता विजय देवरे यांनी महानगर पालिकेत मांडल्या.



