नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महावितरणचे कार्यकारी अभियंता सह लेखापाल 36 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ ACB च्या जाळ्यात

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे

कोल्हापूर :- तक्रारदार यांना महावितरण ने अनाधिकृतपणे वीज वापर केला याकरीता पाच वर्षाचा एकूण 1,22,678/ रुपये केलेल्या दंडाची रक्कम कमी करून फक्त एका वर्षाचा दंड केला म्हणून आरोपी 1) सुयोग दिनकर पाटणकर, वय 47 वर्षे, पद – अतिरिक्त कार्यकारी अभियंता, (वर्ग 01) महावितरण अ, उपविभागीय कार्यालय इचलकरंजी, कोल्हापूर व आरोपी 2) रवींद्र बापुसो बिरनाळे, वय- 38 वर्षे, सहायक लेखापाल, वर्ग – (03) महावितरण अ, उपविभागीय कार्यालय इचलकरंजी यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम 41,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 36,000-/ रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर आरोपी क्रमांक 1) सुयोग पाटणकर यांनी सदर लाच रक्कम आरोपी क्रमांक 2)रवींद्र बिरनाळे यांचेकडे देण्यास सांगितली त्याप्रमाणे आरोपी क्रमांक 01 यांनी लाच रक्कम घेणेस सहमती दर्शवून आरोपी क्रमांक 02 यांनी आरोपी क्रमांक 01 यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडून मागणी केले प्रमाणे 36,000/- रुपये स्वतः करीता व आरोपी क्रमांक 01 सुयोग दिनकर पाटणकर यांच्या करिता लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी, जि. कोल्हापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
➡️ सापळा पथक प्रमुख :- श्री. सरदार नाळे(पोलीस उप अधीक्षक) श्रेणी पो.उप निरीक्षक श्री. संजीव बंबरगेकर, पोहेकॉ /श्री. विकास माने, पोकॉ/ रुपेश माने, पोकॉ/ मयूर देसाई, चापोहेकॉ विष्णू गुरव ला.प्र.वि. कोल्हापूर यांनी करवाई
1) मा. श्री अमोल तांबे,(पोलीस अधीक्षक) लाप्रवि,पुणे. (मोबा.9922100712)
2)मा.श्री. विजय चौधरी.(अपर पोलीस अधीक्षक) लाप्रवि पुणे.
(मोबा. 9607323232) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:07 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!