नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मजरे शिरगाव येथे खाजगी सावकारीने घेतला एकाचा बळी

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव/ संदिप सकट


कोल्हापूर :- चंदगड तालुक्यात अवैध धंदे आणि विनापरवाना सावकारी पाश याचा विळखा किती घट्ट रुजला आहे याची आठवण करुन देणारी दुर्दैवी घटना सोमवारी चंदगड परिसरात घडली आहे. व्याजाने दिलेले पैसे परत करण्यावरून झालेल्या हाणामारीत सुरेश भोगण (रा. मजरे शिरगाव,ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दत्तू धोंडीबा गावडे (रा. नागणवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पत्नी साधना सुरेश भोगण यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश भोगण यांचे चंदगड फाट्यावर हॉटेल सेलिब्रेशन असून त्यासाठी आरोपी दत्तू गावडे यांनी दहा टक्के व्याजाने ४० हजार दिले होते. ते पैसे परत करण्यावरून दोघांमध्ये शिवीगाळ होवून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होवून आरोपीने भोगण यांच्या डोक्यात लाकडी टोण्याने वार केला. त्यात ते गंभीर जखमी होवून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा काल (दि. १७ ऑक्टो. रोजी) मृत्यू झाला. या प्रकरणी दत्तू गावडे याला चंदगड पोलीसांनी अटक केली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तसेच
विनापरवाना खाजगी सावकारी केल्याप्रकरणी दत्तू गावडे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी खाजगी सावकारी अधिनियम अंतर्गत त्याविरुद्ध कारवाई करण्यात येत असून या प्रकरणी चंदगड सह.पोलिस निरीक्षक मुल्ला अधिक तपास करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:30 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!