नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मराठा आरक्षणाच्या समर्थनात देवरवाडी येथे कँडेल मोर्चा

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – संदिप सकट


चंदगड : मराठा आरक्षण कायम स्वरुपी व तत्काळ मिळावे या न्याय मागणीसाठी मराठा क्रांतिकारक योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी आज दि.३० ऑक्टोबर २०२३ रोजी देवरवाडी ता.चंदगड सायं ८ वा कँडेल मोर्चा काढण्यात आला.

घोषणा देताना सकल मराठा समाज

गावातील मराठा बांधवांनी संपूर्ण गावभर फिरून मराठा आरक्षणाबाबत जनजागृती केली. मनोज जरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण अशा विविध घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत हे सरकार जरंगे पाटील यांची मागणी मान्य करीत नाही तोपर्यंत देवरवाडी गावातील मराठा समाज बांधवांनी उद्या पासून साखळी उपोषण करण्याचे ठरविण्यात आले.

या कँडल मोर्चाचे आयोजन प्रा. नागेंद्र जाधव, संदीप अर्जुन भोगण, प्रवीण पाटील, उमेश भांदुर्गे, यांनी केले तर या मोर्च्यात उपसरपंच गोविंद आडाव, सेवा सोसायटी चेअरमन शंकर भोगण, उद्योजक विजय भांदुर्गे, उमेश भोगण, संघर्ष प्रज्ञावंत, पुंडलिक दीक्षित, संजय भोगण, प्रकाश करडे, अमोल भोगण, विनोद मजुकर, वैजनाथ भोसले, महेश जाधव, अमृत सुरेश भोगण, प्रमोद भोगण, वैभव केसरकर, शंकर गुंडप, सुरेश सोमना भोगण, मष्णू वर्पे सह अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा नागेंद्र जाधव, संदीप भोगण, संघर्ष प्रज्ञावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले व उद्या सकाळी पासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे ग्रामस्थांच्या समवेत जाहीर करण्यात आले. त्याबाबतचे निवेदन ई मेल द्वारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी कोल्हापूर, तहसीलदार, पोलीस निरीक्षक चंदगड यांना पाठविण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:13 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!