नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापुर मनपाचे दोघे लिपिक 3,500 रु. लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर :- लाच मागणे जणू काही सरकारी लोक सेवकांचा हक्कचं नागरिकांकडे आहे. अश्या आविर्भावात सरकारी लोकसेवक लाच मागताना आढळत आहेत. लाच मागणे हा गुन्हा आहे व लाचखोरीचे समूळ नष्ट करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग राज्यात जोमाने काम करत आहे.
त्यातच कोल्हापूरात एक लाच मागण्याची घटना दक्षता जनजागृती सप्ताहात घडली कोल्हापूर विभागाने तत्काळ कारवाई केली.
कोल्हापुरात तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या घराची मालकी हक्काची नोंद त्याच्या नावे करण्यासाठी आरोपी 1) शेखर अरुण पाटील. वय – 26 वर्षे, पद – मुकादम तथा लिपिक, याने तक्रारदार यांच्याकडे 5,000/-₹ लाचेची मागणी केली. आरोपी शेखर पाटील याने मागणी केलेली लाच रक्कम त्याला देण्याकरिता आरोपी 2) रोहित विनायक जाधव, वय – 32 वर्षे, पद – मुकादम तथा लिपिक याने आरोपी शेखर पाटील याच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिले त्यानंतर याने तक्रारदार यांचेकडे 5,000/-₹ लाच रक्कम मागणी केलली प्रमाणे तडजोडीअंती 3,500 रु. लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्याला रंगेहात पकडण्यात आले त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून दोन्ही आरोपी विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली होती.
त्या दोन्ही आरोपींना दि. 03 /11/2023 रोजी कोर्टात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सदर सापळा यशस्वी करण्यासाठी दिनांक :- 02/11/2023 पोलीस उप अधीक्षक, कोल्हापूर श्री. सरदार नाळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बापु साळुंके, पोहेकॉ/ विकास माने, पोहेकॉ / सुनील घोसाळकर, पोना/सचिन पाटील, मपोकॉ / पुनम पाटील ला. प्र. वि.कोल्हापूर कसोशीने प्रयत्न केले.
त्यासाठी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. 1)मा. श्री अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लाप्रवि, पुणे.(मोबा.9922100712)
2) मा.श्री. विजय चौधरी (अपर पोलीस अधीक्षक) लाप्रवि पुणे. (मोबा. 9607323232)

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!