DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – रविंद्र गवळे
नंदुरबार:- आयुष्यात चढउतार सोसून पक्का झालो. चढ उतारांची शिदोरी आयुष्यात महत्वाची असते. जीवनात ज्ञानदानाचे चांगले काम करून समाधानी असून काम करतांना मतभेद आयुष्यात खूप झाले पण मनभेद मात्र झाले नाहीत. कारण मतभेद हे तात्विक असल्याचे उद्गार निवृत्त प्राचार्य डॉ.एसपी पाटील यांनी शहादा तालुक्यातील बामखेडा येथे काढले. ते ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयाच्यावतीने आयोजित सत्काराला उत्तर देतांना बोलत होते. यावेळी मंचावर ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.बी पटेल उपाध्यक्ष डॉ. के.एस.चौधरी, सचिव बी.व्ही.चौधरी, एन मुक्ता संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन बारी, उमविचे परिषद सदस्य डॉ. शिवाजीराव पाटील, अधिसभा सदस्य डॉ. गजानन पाटील, डॉ. सुषमा पाटील, प्राध्यापक डॉ. नंदा वसावे, प्रभारी प्राचार्य डॉ. बी.एन.गिरासे उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांनी आपल्या कार्यकाळात महाविद्यालयास बी प्लस प्लस,पाच प्राध्यापकांची पी.एच.डी.पदवी यशस्वी केली. विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या,वृक्षारोपण व संवर्धन यासारखे उपक्रम राबविले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसएस दुथडे, प्रास्ताविक बीएन गिरासे यांनी तर आभार प्राध्यापक सीएस करंके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.



