धुळे पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे
मुंबई :– राज्य गृह विभागाने सोमवारी सायंकाळी काही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांचा समावेश आहे. दरम्यान, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची पुणे शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीनिवास घाडगे (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर)
संभाजी सुदाम कदम (पोलीस उपायुक्त, अमरावती शहर ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर)
इतर अन्य काही अधिकार्यांच्या बदल्या खालील प्रमाणे
गणेश शिंदे (अप्पर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ते पोलीस उपायुक्त, अमरावती शहर)
श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे ते पोलीस अधीक्षक, धुळे)
तुषार दोषी (पोलीस अधीक्षक, जालना ते पोलीस अधीक्षक, सीआयडी, पुणे)
श्रीकांत धिवरे हे 2003 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना ऑक्टोबर 2022 मध्ये जारी केली आहे. आयपीएसचा दर्जा ज्येष्ठतेनुसार मिळतो. सचोटी आणि चांगले रेकॉर्ड आणि करिअर शीटवर एकही प्रतिकूल नोंद असून चालत नाही. या अधिकाऱ्यांना हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये काही महिन्यांसाठी आयपीएस इंडक्शन कोर्स करावा लागणार आहे. तर धिवरे यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट मधून 1997 मध्ये पत्रकारीतेची पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे.
पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस पुणे व सीआयडी पुणे युनिटमध्ये यापूर्वी काम केले आहे.



