नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पतंगीच्या मांजाने गळा चिरला, त्यात पोलीसाचा मृत्यू झाला

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हितेशकुमार सेठाने

मुंबई :- मकर संक्रांतीची चाहूल लागली की लोक पतंग उडवत असतात पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करतात. पतंग उडवण्याचा आनंद घेताना मात्र काळजी घेतली जात नाही. आपला आनंदचा कोणाच्या जीवाशी खेळ होत असेल तर अशा आनंदाचा उपयोग काय? अशीच दुर्दैवी घटना मुंबईत घडली आपले कर्तव्य पार पाडून पोलीस शिपाई समीर जाधव हे मोटरसायकल वरून घरी जात असताना रस्त्यात पतंगीच्या मांज्याने त्यांचा घात केला.

दिंडोशी पोलिस स्टेशन चे पोलिस शिपाई क्र 111615/ समीर सुरेश जाधव वय 37 वर्षे रा ठी. बिल्डिंग न 77, वरळी बी डी डी चाळ, रूम न 28, वरळी मुंबई हे 15.30 वाजाताचे सुमारास त्यांचे मोटार सायकल वरून कर्तव्य पूर्ण करून त्यांचे वरळी येथील निवासस्थानी जात असताना वाकोला ब्रिज, सांताक्रुज पुर्व मुंबई याठिकाणी मांजा ने गळा चिरल्याने त्यांना खेरवाडी मोबाईल 1 यांनी उपचार कामी तात्काळ सायन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे.
सदरची माहिती खेरवाडी पोलीस स्टेशन चे व पो. नी. राजेंद्र मुळीक यांनी 18.06 वाजता मोबाईल द्वारे कळविले आहे.
सायन रुग्णालयात खेरवाडी पोलीस स्टेशन चे पोलिस पथक हजर असून त्यांचे नातेवाईकांना कळविण्यात आलेले आहे तसेच दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सदर ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आलेले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:36 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!