नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गुटख्या सह डीजेल, पेट्रोलचा अवैध साठा बाळगणाऱ्यावर निजामपुर पोलिसात गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – हेमंत महाले

साक्री:- साक्री तालुक्यातील वेहेरगांव फाट्यावरती किराणा दुकानात प्रतिबंधीत गुटख्यासह डिझेल, पेट्रोलचा साठा विक्रीच्या हेतूने व्यापारी बाळगत असल्याची गुप्त माहिती निज़ामपुर पोलिस स्टेशन चे स. पो.नी. गायकवाड यांना मिळाली त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या धडक कारवाईत त्या व्यापाऱ्यांवर निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यातील व्यापारी त्या दुकान आढ़ळून आला नसून मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक वृत्त असे की, तालुक्यातील वेहेरगाव गावात एक व्यापारी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधीत गुटख्यासह डिझेल व पेट्रोलची त्यांच्या दुकानात विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने निज़ामपुर पोलिसानी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास वेहेरगांव फाट्यावर गावातील एका दुकानांवर छापा टाकत प्रतिबंधित गुटखा, व अवैध पेट्रोल -डीज़ेल चा साठा असा एकूण १६३७३ रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पो. कॉ. सुनील अहिरे यांच्या फिर्यादिवरुन निज़ामपुर पोलिस स्टेशनला व्यापारी संजय मुरलीधर येवले रा. वेहेरगाव यांच्या विरुद्ध विविध भा. द. वी कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तापस पो. स. ई. गाँगुर्डे करीत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!