नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

विदर्भात जनसंपर्कासाठी अजित दादांनी नागपूरमध्ये उघडले विभागीय कार्यालय


DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदिले
नागपुर :- उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे विभागीय कार्यालय नागपूर येथील ‘विजयगड’ या त्यांच्या शासकीय बंगल्यात कार्यान्वित करण्यात आले आहे. सचिन यादव हे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे आता विदर्भातही अजितदादांच्या कामाचा धडाका अनुभवण्यास मिळणार आहे.
नागपूर, अमरावती विभागातील नागरिक, सामाजिक संस्था व संघटनांची कामे स्थानिक स्तरावरच मार्गी लागावीत, मुंबईपर्यंत येण्याचा त्यांचा त्रास थांबावा या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे विभागीय कार्यालय सुरु केले आहे. नागपूरमधील नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याबरोबरच, मंत्रालयाशी संबंधीत त्यांची कामे तसेच कामांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे.
विदर्भातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री यांच्याशी संबंधित कामांसाठी नागपूर विभागीय कार्यालयात किंवा उपमुख्यमंत्र्यांचे (वित्त व नियोजन) विशेष कार्यकारी अधिकारी सचिन यादव यांच्याशी 9421209136 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

प्रशांत पवार व गुजर यांची होती मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागपुरात कार्यालय असावे अशी मागणी शहर अध्यक्ष प्रशांत पवार व जिल्हाध्यक्ष बाबाभाऊ गुजर यांनी अजित पवारांकडे सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या मागणीला यश येऊन नागपुरात अजित पवारांचे विभागीय कार्यालय सुरु झाले. त्याकरिता प्रशांत पवार व बाबाभाऊ गुजर यांनी अजित पवारांचे आभार मानलेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:08 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 61 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!