नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एकाच नंबरचे दोन टिप्पर; एक भिवापूरात तर दुसरा उमरेडात जप्त

एन्ट्री वाचविण्यासाठी नवा फंडा

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी::- सुनिल मैदीले
भिवापूर :- महिन्याला द्यावी लागणारी ‘एन्ट्री’ वाचवीण्यासाठी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्पर मालकांनी बोगस नंबर प्लेटचा वापर सुरु केला आहे. उमरेड व भिवापूर येथील महसूल अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेल्या वाहनांत एकाच नंबरचे दोन टिप्पर मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
गत शुक्रवारी (दि.12) उमरेड तहसील कार्यालयाच्या पथकातर्फे वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर जप्त करण्यात आले होते. त्यात एमएच 36 एए 7833, एमएच 40 बीएल 7345 आणी एमएच 40 सीआर 6557 या क्रमांकाच्या टिप्पर चा समावेश आहे. तीन पैकी दोन टिप्पर उमरेड तहसील कार्यालयाच्या आवारात तर एक येथील पोलीस स्टेशन आवारात उभा आहे. या कारवाईच्या पाच दिवसांनी भिवापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संजय राठोड यांनी बुधवारी (दि.17) सकाळी वाळू भरलेला एक टिप्पर जप्त केला. या टिप्परचा क्रमांक एमएच 40 सीआर 6557 असा असून तो येथील पोलीस स्टेशनचा आवारात उभा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच क्रमांकाची नंबर प्लेट असलेला टिप्पर पाच दिवसांपूर्वी उमरेडच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला व तो आज पण तेथील कार्यालयात उभा आहे. एकाच क्रमांकाचे दोन टिप्पर एकाच वेळी दोन ठिकाणी जप्त असल्याने राज्य परिवहन विभागाचे अधिकारी करतात तरी काय ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. महसूल विभागाने केलेल्या कारवाईत बोगस नंबर प्लेटचा घोळ समोर आला. बोगस नंबर प्लेट वापरून इतरही काही वाहने वाळूची वाहतूक करीत असल्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली असून त्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

एंट्री वाचविण्यासाठी बोगस नंबर प्लेटचा वापर ?

वाळूची अवैध वाहतूक करणारे वाहन मालक कारवाई टाळण्यासाठी काही अधिकाऱ्यांना प्रत्येक वाहणामागे ‘ एन्ट्री ‘ ची भेट चढवितात. ही भेट चढवीतांना वाहणांचे नंबर संबंधितांना द्यावे लागते. एन्ट्री वाचविण्यासाठी काही वाहन मालकांकडून बोगस नंबर प्लेटचा फंडा अमलात आणल्या जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकाच एन्ट्रीवर दोन वाहने चालविली जातात. त्याद्वारे एन्ट्री घेणाऱ्यांचीसुद्धा फसगत केली जाते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!