नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हजरत बाबा ताजुद्दिन यांची जयंती जल्लोषात साजरी

फोटो – केक कापतांना दिलीप गुप्ता, प्रदीप राऊत, जोगेंद्र सरदारे, सुनील मैदिले व इतर


DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- हजरत बाबा ताजुद्दिन यांची जयंती येथे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटन सचिव सुनील मैदिले व मित्र मंडळींनी येथील विठ्ठल मंदिरासमोरील चौकात मोठा मंडप उभारून त्याला विविध रंगाची फुले, तोरण आणी फुग्यांनी सजविले होते. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप गुप्ता यांच्या हस्ते भला मोठा केक कापून बाबा ताजुद्दीन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नागरिकांकरिता महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार प्रदीप राऊत, पत्रकार जोगेंद्र सरदारे, रमेश भजभूजे आदींसह नागरिक उपस्थित होते. बसस्थानक परिसरात गोलु खापरिकर व मित्र मंडळिंनी बाबा ताजुद्दिन यांच्या जयंती निमित्त महाप्रसाद वितरित केले. यावेळी जि.प. सदस्य शंकर डडमल यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तत्पुर्वी शहरातुन वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. आझाद चौक, रामधन चौक, धर्मापूर पेठ, तहसिल कार्यालय चौक परिसरातही बाबा ताजुद्दिन जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:27 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!