DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : दि. 4 फेब्रुवाऱी रोजी आदिवासी परीवार (सर्व समावेशक) समाज बैठक साक्री येथे पार पडली, दि. 26 जानेवारी रोजी दिघावे येथील भील समाजाचे अतिक्रमण जमीन धारक शेतकरी यांची धाण्याची गरी गावगुंड लोकांच्या मदतीने फॉरेस्ट चे कर्मचारी यांनी पेटवून दिली व दिघावे गावातील ग्रामसभेत हेच गावगुंड भील समाजाच्या लोकांना मारून टाकू तोडून टाकू असे वक्तव्य करत होते, सदर गुन्हेगार यांच्या विरोधात पोलिस प्रशासनाने अजुनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही यासाठी पुढील नियोजन करण्यासाठी समाजातील मान्यवर आदिवासी कॉंग्रेस महाराष्ट्र राज्य सचिव इंजी. अशोकजी सोनवणे, एकलव्य संघटना महाराष्ट्र जेष्ठ पदाधिकारी ऐडव्होकेट राजन वाघ व सहकारी, छड़वेल प. मालपुर, सायने, निज़ामपुर, उमराड़ी, पखरुण, चिंचपाडा, शेवाळी व धमणार येथील मान्यवर, एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषद उपजिल्हाध्यक्ष रविंद्र अहिरे व साक्री तालुका कमेटी तसेच आप की जय परीवार म्हसदी येथून बापू भील व सहकारी, दिघावे येथील पीड़ित शेतकरी व एकलव्य युवा संघटना पदाधिकारी असे समाज बांधव वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते.



