DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- संजय गुरव
धुळे येथील गुरव समाजाची तीन राज्याची मायबोली संस्था गुरव समाज उन्नती मध्यवर्ती संस्थेचा भवनावर गुरव समाजाचे आराध्य दैवत श्री संत काशिबा गुरव महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यात येणार आहे.
महादेवाचे पुजारी म्हणून ओळखला जाणारा गुरव समाज संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेला आहे.देशभरातील गुरव समाज पूर्वीपासूनच महादेवाची पूजा करत आलेला आहे. गुरव समाजाचा प्रमुख व्यवसाय बेलफुल वाटप करणे तसेच शहनाई वाद्य वाजविणे असून याशिवाय देशभरात विविध व्यवसायात सुद्धा हा समाज प्रगती करत आहे.
अशा या गुरव समाजाचे आराध्य दैवत म्हणून श्री संत काशिबा गुरव महाराज यांचे नाव घेतले जाते.श्री संत काशिबा महाराज यांचा कोणत्याही ठिकाणी सामाजिक स्थळावर पुतळा नव्हता याच्या खंत संपूर्ण समाजाला होता.
धुळे येथील धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळ चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सर्वांनी मिळून श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुतळा बसवावा असे ध्येय निश्चित केले.
दि.8 मार्च,2024 शुक्रवार रोजी महा-शिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळ श्री संत काशीबा गुरव महाराज यांचा पुतळा विधिवत गुरव समाजाची तीन राज्यांची मायबोली संस्था गुरव समाज उन्नती मध्यवर्ती संस्था धुळेच्या भवनावर बसवणार आहेत.संपूर्ण गुरव समाजासाठी हा गर्वाचा व अविस्मरणीय प्रसंग आहे.या शुभ कार्यामध्ये गुरव समाजातील संपूर्ण देशातील विविध पुढारी,विविध मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच गुरव समाज बंधू भगिनी व लहान बालगोपालांना जाहीर आमंत्रण देण्यात आलेले आहे.
गुरव समाजासाठी हा सोहळा एक ऐतिहासिक सोहळा म्हणून प्रसिद्ध होणार आहे.श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुतळा बसवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.
ज्यावेळेस धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत बेगराज सूर्यवंशी यांचे वडील कै. बेगराज यादव सूर्यवंशी यांचे निधन झाले होते त्यावेळेस त्यांच्या उत्तर कार्याच्या दिवशी वडिलांच्या स्मरणार्थ शशिकांत बेगराज सूर्यवंशी यांनी संकल्प केला होता की आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ काहीतरी समाजहिताचे व समाजाला गर्व वाटेल असे कार्य करू.त्यावेळेस त्यांच्या मनात विचार आला की गुरव समाजाचे आराध्य दैवत श्री संत काशीबा गुरव महाराज यांचा पुतळा कोणत्याही ठिकाणी स्थापन करण्यात आलेला नाही. आपल्या मनात संकल्प करत शशिकांत बेगराज सूर्यवंशी यांनी गुरव समाज उन्नती संस्थेच्या भवनावर श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुतळा वडिलांच्या स्मरणार्थ बसवण्याचे जाहीर केले. वडिलांचा उत्तर कार्याच्या दिवशी दिलेला शब्द शशिकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने दि.8 मार्च 2024 शुक्रवार रोजी पूर्ण करणार आहेत.जशी ही बातमी गुरव समाजात पसरली तशी एक आनंदाची धारा या समाजात वाहू लागली.संपूर्ण गुरव समाजात गौरव पूर्ण क्षण येत आहे.
या सोहळामध्ये हरि भक्त पारायण करणारे महाराज यांच्या सहकार्याने श्री संत काशिबा महाराजांची एक मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे.या मिरवणुकीमध्ये गुरव समाजातील जवळजवळ 300 महिला एकाच रंगाच्या साडीमध्ये सहभागी होणार आहेत.दि.8 मार्च,2024 रोजी जागतिक महिला दिवस आहे.या सोहळा मध्ये जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून महिलांना सन्मान मिळावा म्हणून हळदी-कुंकू चा ही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.संपूर्ण सोहळा हा आध्यात्मिक असून अध्यात्मला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे.या सोहळा मध्ये भारतभरातील गुरव समाजातील अनेक समाजसेवक सहभागी होणार आहेत.जवळ जवळ तीन ते चार हजार लोकांचा हा कार्यक्रम होणार आहे.
श्री संत काशिबा महाराज यांच्या पुतळा शशिकांत सूर्यवंशी हे स्वखर्चाने बसवणार असून इतर खर्च समाज गंगेचा माध्यमाने मिळालेला आहे. गुरव समाजातील अनेक मान्यवरांनी अन्नदानासाठी सहकार्य केलेले आहे.
या सोहळा साठी विशेष योगदान देणारे धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत बेगराज सूर्यवंशी,विश्वस्त भीमराव शंकर गुरव,विनोद हिरामण गुरव,सुनील गुलाबराव शिंदे,डॉ.अरुण निवृत्ती गुरव,अध्यक्ष योगेश दिलीप गुरव,सचिव गणेश दगडू गुरव,उपाध्यक्ष निलेश रामचंद्र गुरव,कोषाध्यक्ष राकेश प्रकाश गुरव,प्रवक्ते नितीन दुलिचंद गुरव,सल्लागार नानाभाऊ झुलाल गुरव,अशोक डी.ठाकरे,लोटन डी.चव्हाण,विजय दगडू सूर्यवंशी, सदस्य राजेश कांतीलाल गुरव,महेश सुरेश गुरव,गणेश आधार गुरव,मयूर सुरेश गुरव,जयंत दिनानाथ गुरव,अमोल सुदाम सूर्यवंशी,प्रसिद्धी प्रमुख भानुदास कृष्णा गुरव तसेच धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळातील सर्व सदस्य व धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास महिला मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने सदर सोहळा उत्साहात पार पडणार आहे. वरील सर्व मान्यवरांनी गुरव समाजाला सदर सोहळा मध्ये उपस्थिती देण्यासाठी आवाहन केलेले आहे.