नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सरंपचपतीने घेतली १० हजारांची लाच!

सांगोल्यातील आलेगावच्या महिला सरपंच व त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हा

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ सांगोला : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी सरपंचपती तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला. याबाबत आलेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे व त्यांचे पती पांडुरंग रामचंद्र दिवसे (रा. आलेगाव, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध लाचलुपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार यांना आलेगाव (ता. सांगोला) येथील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभागृहाचे काम मिळाले होते. हे काम तक्रारदाराने पूर्ण केल्यानंतर त्यांनी बिल मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला. याबाबत आलेगाव ग्रामपंचायतच्या महिला सरपंचांचे पती पांडुरंग दिवसे यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांना तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने १७ जानेवारी, २३ जानेवारी व २९ जानेवारी रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता, पांडुरंग दिवसे यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी केलेल्या कामाचे दोन हजार रुपये व सध्याच्या कामाचे आठ हजार रुपये असे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत महिला सरपंचाकडे पडताळणी केली असता त्यांनी लाचेची रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास सांगितले. गुरुवारी (ता. १५) तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना सरपंचाच्या पतीला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाच्या वतीने पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस अंमलदार प्रमोद पकाले, पोलिस शिपाई गजानन किणगी, राहुल गायकवाड, श्‍याम सुरवसे यांनी या कारवाईसाठी सापळा रचला होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:01 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!