DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️
प्रतिनिधी- संदीप संकट
कोल्हापूर :- न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रा डॉ. नागेंद्र कृष्णा जाधव यांची निवड झाल्याने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन छावा मराठा युवा संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी प्रा. नागेंद्र जाधव यांचा पुष्पगुच्छ, शाल देवून पाटणे फाटा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी छावा मराठा युवा संघाचे पदाधिकारी किरण नागुर्डेकर, संभाजी पाटील, गजानन गावडे, विजय आवडण, युवराज जाधव, प्रसाद निटटूरकर, संदिप सकट आदी मंडळी उपस्थित होती. या पदाचे कर्तव्य व जबाबदारी याचे भान ठेवून न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्व सामान्य, गोर गरीब, वंचित लोकांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे व सर्व प्रकारच्या अन्यायाविरोधात जोरदार लढा देणार असल्याचे प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले.



