DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
नागपूर :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला एमआयडीसी बुटेबोरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ठाणेदार राजीव कर्मलवार यांनी एमआयडीसी परिसरातील अँन इंजिनिअरिंग कंपनीच्या बाजूला बंद असलेल्या जुन्या कंपनीच्या हॉलवर धाड घातली. यावेळी आरोपी महिला ही दोन पिडीत महिलांना पैशाचे अमिष देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपी महिलेला रंगेहाथ अटक करून बेड्या ठोकल्या. दोन्ही पिडीत महिलांची सुधारगृहात रवानगी केली. आरोपी महिलेविरुद्ध कलम 3,4,5 यासह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमंतराज भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राम खोत, अंमलदार दीप पांडे, संतोष तिवारी, श्रीकांत गौरकार, निशा हंबरे यांच्या पथकाने पार पाडली.



