नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मुंबईत पुन्हा 42 लाखांचे एमडी ड्रग्ज पकडले
विक्री करणारे महिला व पुरुष अटक करण्यात आली

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नंदकुमार नामदास

मुंबई – अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या महिला व पुरूषाला मुंबई गुन्हे शाखा, कक्ष- 12 ने अटक केली असून त्यांच्या कडुन 42 लाखांचे 285 ग्रॅम ’मेफेड्रॉन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
मुंबई गुन्हे शाखा, कक्ष- 12 यांना 3 मार्च 2024 रोजी पहाटेच्या सुमारास सार्वजनिक शौचालय जवळ, एच वॉर्ड-47, बी.एम.सी. कॉलनी, संतोष नगर, जनरल ए.के. वैद्य मार्ग, गोरेगाव पुर्व, मुंबई याठिकाणी एक महिला आरोपी, (वय 39 वर्षे) व एक पुरूष आरोपी मोहम्मद हनिफ रफिक खान (वय 48
वर्षे हे संशयीतरित्या आढळुन आले. पोलीस पथक त्यांच्याजवळ गेले असता सदरची महिला व तिच्या सोबत असलेला पुरूष हे पळुन जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

त्यावेळी त्या दोघांच्या ताब्यातून 42 लाख 75 हजार रुपयांचा 285 ग्रॅम ’मेफेड्रॉन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच 1 लाख 11 हजार 500 रोख रक्कम व डिजीटल वजन काटा आदी मुद्देमाल मिळुन आला. त्याप्रमाणे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद क्र. 17/2024 कलम 8(क), 22(क),29 एन. डी. पी.एस. कायदा 1985 (दिंडोशी पोलीस ठाणे वि.स्था.गु.नों.क्र. 195/ 2024) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीताच्या ताब्यात मिळुन आलेला अंमली पदार्थ त्यांनी कोठुन आणला व ते कोणास विक्री करणारे होते याबाबत अधिक तपास करण्यासाठी त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 7 मार्च 2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्या पुढील तपास कक्ष 12 करीत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्तविवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुकक्त(गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशिकुमार मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1), विशाल ठाकुर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (प्र-उत्तर), काशिनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, स.पो.नि सावंत, स.पो.नि रासकर, हवालदार लक्ष्मण बागवे, सुनिल चव्हाण, शेलेश बिचकर, विशाल गोमे, प्रसाद गोरूले, श्रीमती कदम (नेमणुक कक्ष-11), श्रीमती खाडे (नेमणुक कक्ष-10) यांनी पार पाडलेली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:12 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!