DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने
भडगांव : भडगांव ब्रेकिंग सपासपवार या मथळ्याखाली मध्यरात्री बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यातील पुढील सविस्तर अधिकृत बातमी पुढे,,,,••• दुचाकी पुढून बाजूला हो असे बोलण्याचा राग येऊन भडगांव शहरातील पारोळा चौफुलीवरील शिव बिर्याणी लोटगाडीसमोर भडगांव तालुक्यातील कोठली येथील युवकावर भडगांव शहरातील एका तरुणाने ब्लेड ने सपासप वार करून गंभीर दुखापत केली असल्याची घटना दिनांक 5 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली असून त्याप्रकरणी भडगांव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दिनांक 05 मार्च मंगळवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भडगाव शहरातील पारोळा चौफुलीवरील पारोळा रोडला असलेल्या शिव बिर्याणी लोटगाडी जवळ कोठली येथील रहिवासी व ग्रामपंचायत शिपाई रवींद्र शांताराम पाटील यांचा मुलगा एकनाथ रवींद्र पाटील हा गावातीलच विशाल याचे सोबत मोटर सायकलीने वेल्डींग दुकानाकडे येत असतांना मोटर सायकलीच्या पुढे उभा असलेला रवींद्र नामक भडगाव पेठ भागातील शहरातील युवक यास दुचाकीसमोरून बाजुला होण्याबाबत सांगीतले असता त्याने एकनाथ पाटील याचे मोटर सायकलीची चाबी काढुन घेतल्याने त्याचे कडेस विशाल याने मोटर सायकलची चाबी मागीतली असता त्याचा राग येवुन रवींद्रने विशाल याची कॉलर पकडुन त्यास चापटा बुक्यानी मारहान, शिवीगाळ करु लागला तर एकनाथ पाटील हा भांडण सोडवत असतांना त्याचे मानेवर डाव्या बाजुस धारधार ब्लेड ने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून मी तुमचा गेम करतो अशी धमकी दिली म्हणून भडगांव पोलिस स्टेशन येथे वडील रवींद्र शांताराम पाटील यांचे फिर्यादीवरून कलम 307, 323, 504, 506 कलमान्वये संशयित आरोपी रवींद्र नामक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.