नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलीसांचा रूट मार्च

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री:- धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिसांकडून आगामी लोकसभा निवडणूका व होळी, रमजान ईद अशा सर्व जाती धर्माचे सण उत्सव या अनुषंगाने पिंपळनेर पोलिसांकडून सकाळी ११:४० ते १२:४० वाजेच्या सुमारास रूट मार्च काढण्यात आला. पिंपळनेर शहर पोलीस स्टेशन पासून, बस स्थानक, पंचमुखी कॉर्नर, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, जामा मस्जिद, खानका मस्जिद, नाना चौक, माळी गल्ली, रामनगर, नूरानी मस्जिद, इंदिरानगर, बाबा चौक येथे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली बीएसएफ चे २ अधिकारी, ५० जवान, पोलीस स्टेशनचे २५ अमंलदार, आरसीएफ पथक व ३८ होमगार्ड आदी कर्मचारी रुट मार्च मध्ये सहभागी झाले होते. सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:27 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!