DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री :- साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघ व साक्री तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन साक्री पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, प्राचार्य नरेंद्र तोरवणे, जन ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, साक्री तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण तोरवणे, मुख्याध्यापक विद्यानंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, संदीप माळी,पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप लोखंडे,प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष जगदीश शिंदे,जितेंद्र जगदाळे, संघपाल मोरे, नाना ढालवाले,वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष शरद वाघ, ज्ञानेश्वर शिवदे, नानासाहेब वाघ, भाऊसाहेब वाघ,नितीन मोहिते,शांतीलाल पाटील, राज चव्हाण,योगेश महाजन, महेश अहिरराव, विनोद महाजन, प्रवीण पाटील, संतोष सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सातवीतला विद्यार्थी दर्शन रवींद्र यांच्या जीवनावर आपल्या उत्कृष्ट शैलीने प्रकाशझोत टाकला. सुत्रसंचलन बाळकृष्ण तोरवणे तर आभार जगदीश शिंदे यांनी मानले.