DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे – घरकुलाच्या झालेल्या बांधकामाचे फोटो काढुन नजरी तपासणी करुन त्याचे मुल्यांकन साक्री पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेतांना साक्री पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाचा अभियंता परेश प्रदीपराव शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील तक्रारदार घोडदे ता. साकी जि. धुळे येथील रहिवासी असुन त्यांना शबरी आवास योजने अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये मौजे घोडदे, ता. साकी येथे घरकुल मंजुर झाले आहे. सदर तक्रारदार यांनी पंचायत समिती कार्यालय, साकी येथील घरकुल विभागातील ग्रामीण गृह निर्माण अभियंता परेश प्रदिपराव शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी तकारदार यांचे मंजुर घरकुलाचे फोटो काढुन नजरी तपासणी करुन त्याचे मुल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर करुन धनादेश काढुन देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे १०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार त्यांनी दिनांक १५.०४.२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात दुरध्वनी व्दारे दिली होती.
सदर माहिती वरुन धुळे ला.प्र.विभागाच्या पथकाने मौजे घोडदे ता. साकी येथे जावुन तक्रारदार यांची मेट घेवुन त्यांची तकार नोंदवुन १५ एप्रिल २०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आरोपी शिंदे यांनी तक्रारदार यांचेकडे १,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम सुरत महामार्गावरील घोडदे गावाच्या सर्व्हिस रोडवरील बसस्थानकाजवळ त्यांचे कारमध्ये पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडुन स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडले असुन परेश प्रदिपराव शिंदे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती, साकी यांचे विरुध्द साकी पो.स्टे. जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधिक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.



