नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

१५ हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेविकेला
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

DPT NEWS NETWORK 🗞️✍️


धुळे:– प्रलंबित बिले अदा करण्यासाठी १५ हजार रुपयाची लाच स्वतःच्या घरी स्वीकारताना धुळे जिल्ह्यातील चौगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत महिला ग्रामसेविका राजबाई पाटील यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांनी ग्रामपंचायत चोगांव बु.येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम घेवून ते काम पूर्ण केले. सदर कामावर झालेल्या खर्चाचे बिल तक्रारदार यांना अदा करण्यात आले होते. तसेच तक्रारदार यांनी मौजे चौगांव बु. येथे रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम केले असून त्या कामाकरीता झालेल्या खर्चाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते. म्हणुन तक्रारदार यांनी सुमारे एक महिन्यापुर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेवुन त्यांनी केलेल्या रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली.
ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे रस्ता काँक्रीटीकरणावर झालेल्या खर्चाचे बिल काढण्याकरीता तसेच त्यांनी यापूर्वी केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे बिल काढून दिल्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार याना पैसे द्यायचे नसल्याने तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे दि. ४ एप्रिल २०२४ रोजी तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १५ हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. त्या नुसार सोमवार १५ एप्रिल रोजी सापळा रचून कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेकडुन १५,०००/- रुपये लाचेची रक्कम ग्रामसेविकेला शिंदखेडा येथील तिचे राहते घरी स्वत: स्विकारताना रंगेहात त्यांना पकडण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली. या बाबत शिंदखेडा पो.स्टे.येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील,संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर, दिपाली सोनवणे या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधिक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:29 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!