नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळ्यातील पोलीस उपअधीक्षकाला
पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

DPT NEWS NETWORK 🗞️✍️


धुळे :- धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकरांना पाच हजाराची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट कमांक 6 अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. दलातील तक्रारदार व त्यांचे सोबत इतर 5 महिला नर्सिंग ऑफिसर हे  14 व 15 एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर होते. त्यामुळे  सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांच्याककडुन गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता. त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावुन गैरहजर राहिलेल्या कर्मचार्‍यांकडुन प्रत्येकी हजार प्रमाणे एकूण पाच हजार जमा करुन आणुन दे, नाहीतर सर्वांची बिनपगारी करेल, असे तक्रारदार यांना सांगितले होते. तक्रारदार यांना कर्मचार्‍यांकडून पैसे जमा करुन सदरची लाचेचे पाच हजार पारसकर यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात समक्ष येवुन तकार दिली होती.
सदर तक्रारी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी तक्रारदार यांचेकडे प्रती गैरहजर कर्मचार्‍यांकडून हजार प्रमाचे पाच हजाराच्या लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम आज 22 एप्रिल 2024 रोजी  एसआरपी कॉलनी, नकाणे रोड, धुळे येथील राहत्या घरी घेत असताना त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकुन दिली. असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याविरोधात देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपाधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधिक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!