नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

विटाईत एक लाख ६८ हजार  रुपयांची चोरी; साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री : साक्री तालुक्यातील काटवान परिसरातील विटाई येथील केदाबाई हिम्मत खैरनार यांच्या राहत्या घरातून व किराणा दुकानातून एकूण एक लाख ६८ हजार रूपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे . फिर्यादी केदाबाई खैरनार यांनी साक्री पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२८ एप्रील २०२४ रोजी सकाळी ११ ते ०१:३० च्या वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराचे मागचे दरवाजाची फळी तोडून दरवाजाची आतील कडी उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करीत घरातील टीप व किराणा दुकानाचे गल्यामधील व लोखंडी कपाटातील लॉकर मधील खालील वर्णनाच्या व किंमतीच्या सोन्याच्या वस्तू व रोख रूपये त्यांच्या संमती शिवाय लबाडीच्या इरादाणे चोरून नेले.
१) एक लाख रूपये रोख २)१७,००० रूपये किराणा दुकानातील गल्ल्यातील रक्कम.
३)५१,००० रु. किमतीची १५ ग्रॅम वजनाची पोत व दोन ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या.
असा एकूण एक ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला याबाबत साक्री पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूध्द १६६/२०२४ भादवी कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साक्री पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरिक्षक संदीप संसारे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:38 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!