नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महाराष्ट्र दिनी ठिकठिकाणी ध्वजारोहण

फोटो – सायंटिफिक शाळेतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी विद्यार्थी व शिक्षक

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले

भिवापूर :- 1 मेला महाराष्ट्रदिनानिमित्त सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयात तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
  स्थानिक सायंटिफिक कॉन्व्हेंट आणी इंग्लिश मिडीयम शाळेतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरात ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रगीतानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गायले गेले. शाळेच्या पर्यवेक्षिका रागिणी काळे यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. मुख्याध्यापिका रंजना खवास यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. शाळेपासून बस स्टॅन्ड परिसरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी उत्साहात घोषणा देताना व गीत गाताना दिसले. त्याचबरोबर पारंपरिक मराठी वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहानी वराडे तर आभार प्रदर्शन तनुश्री भुरे यांनी केले.

 

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:00 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!