नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भिवापूरात सट्टापट्टी व अवैध दारू व्यवसायाला उधाण

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर:  तालुक्यात जवळी, वासी, झिलबोडी, मेढा, बोरगाव, तास, गोंडबोरी, कारगाव आदींसह भिवापूर शहरातील काही ठिकाणी अवैध दारूचा व्यवसाय मोठया प्रमाणावर राजरोसपणे चालत आहे.दारूच्या पेट्या ठराविक दारूच्या दुकानातून विकत घेतल्या जातात.काही भरकटलेले तरुण मोटारसायकलवरून वेगवेगळया गावात दारूच्या पेट्या पोहचवून देण्याचे काम करतात.शहरात पहाटेपासून अवैध दारू विक्री सुरु असते.या शिवाय शहरात अवैध सट्टा पट्टी व्यवसाय जोरात सुरु आहे.क्रिकेट वरही सट्टा घेतला जातो.दोन तीन माणसे हे अवैध धंदे चालवत आहेत.शाळकरी मुलांचा या कामी वापर होत आहे.अवैध दारू विक्री व सट्टा पट्टीच्या धंद्यामुळे गरीब वर्गातील तरुण नशेच्या आहारी व जुगाराच्या नादि लागून कुटुंब उध्वस्त करीत आहेत.असामाजिक तत्वांना ही परिस्थिती पोषक असल्याने त्याला आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. या धंद्यापासून बक्कळ कमाई होत असल्याने एकाने शहरात आपली एक टोळी उभी केली आहे. कुणी त्याच्या अवैध धंद्याविरुद्ध आवाज उठविल्यास त्याला धमाकावण्याचे प्रसंगी मारहाण करण्याचे काम या टोळीतील गुंड करीत असतात. भविष्यात या लोकांपासून समाजाला धोका निर्माण होऊ शकतो.तरी पोलिस प्रशासनाने वेळीच या अवैध धंदेवाल्यांचे मुसक्या आवळणे गरजेचे आहे,अशी भिवापूर वासियांची मागणी आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!