DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापुर :- वारंवार पोलीस कारवाईनंतर सुद्धा शहरात चालणारा सट्टा व्यवसाय बंद होण्याचे नाव घेत नाही. याबद्दल नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच सुगंधित तंबाखूची भिवापूर शहरात सर्रास विक्री सुरु आहे. सट्टा पट्टी घेणारे भिवापूर शहरात आहेत. धर्मापूर, आंभोरा रोड, तहसील कार्यालय, मटण मार्केट, पहाडपुरा, रामधन चौक, सिनेमा टॉकीज परिसर, कलारओळी चौक या परिसरात काही लोक फोन द्वारे सट्टा पट्टी चा व्यवहार करत आहेत. वेळोवेळी पोलिस प्रशासनाने कारवाई करून देखील अवैध सट्टा व्यवसाय बंद होण्याचे नाव घेत नाही. तसेच क्रिकेट सट्टा भिवापूर शहरात फोफावला आहे. भिवापूर हे शहर शांतता प्रिय शहर आहे. आणी या शहरात बहुतांश कष्टकरी, मजूर वर्ग आहे. या शहरात एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती हा अवैध व्यवसाय चालवत आहे. त्याला पोलिस प्रशासनाची कुठलीच भीती नाही. नागरिकात अशी चर्चा आहे की त्याला एका राजकीय पक्षाचे पाठबळ असल्यानेच तो खुलेआम अवैध सट्टा पट्टीचा धंदा चालवतो. काही लोक चालता फिरता सट्टा पट्टी चालवतात. या धंद्यांना पोलिसांचा विरोध असतानाही सट्टा व्यवसाय आणी सुगंधित तंबाखूचे अवैध धंदे सुरु आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



