देशी दारु टॅंगो पंचच्या ९०० बॉक्स दारु व बोलेरो वाहन असा एकुण ८ लाख ६ हजार किंमतीची दारु वाहनासह जप्त, अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या इसमांस अटक
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- महेशकुमार देवरे
धुळे :- दिनांक «७.०५.९०२४ रोजी ०९.९५ वाजेच्या सुमारास सोनगीर गावाकडून एक इमस बोलेरो पिकअप वाहन क्रमांक (एमएच/१८/एझेड५००६) या वाहनामध्ये अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने विना परवाना दारूची वाहतूक॑ करून धुळेकडे येत आहे, अशी पोलीस निरीक्षक धनंजय व्ही. पाटील यांना गुप्त बातमी मिळाली. मिळालेल्या बातमीची हकीकत कळवून हायवे रोडच्या सर्व्हीस रोडने वाहने तपासणी करून तपासणी करुन कायरदोशिर कार्यवाही करणे बाबत नगावबारी येथील चेकपोस्टवरील अधिाकरी स्वप्नील पाटील यांना कळविले. त्यानुसार वरील वर्णनाचे वाहन चेकपोस्टवर आले असता त्याची तपासणी केली असता चालक रामेश्वर गुलाब दळवी (वय 31, रा. सांगवी, ता, शिरपूर. जि. धुळे) यांनी उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता. त्यात तीन लाख 6 हजार किंमतीचे दारू व शंभर बॉक्स देशी दारू टँगो पंच कंपनीची 864 लिटर दारू व 4 लाख 70 हजार किंमतीचे बोलेरो वाहन असा एकूण आठ लाख 6 हजार किंमतीचे मुद्देमाल जप्त केला. याबाबत देवपूर पोलीस ठाण्याचे हवालदार यांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. जे. शेख अधिक तपास करीत आहे.
दरम्यान, धुळे शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमी व आदर्श आचार संहितेचे पालन काटेकोरपणे पालण होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक क्रषीकेश रेड्डी यांनी धुळे शहरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भभवू नये म्हणुन देवपुर पोलीस ठाणे अंतर्गत नगावबारी येथे धुळे लोकसभा निवडणूक स्थिर संनियंत्रण पथक चेक पोस्ट उभारणी करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही करण्यात आली आहे.



